Baba Vanga Predictions for New Year 2023: एलियनचा हल्ला, सोलर त्सुनामी ते लॅब बेबीचा उद्यय, बाबा वांगा यांनी वर्तवलीय सन 2023 ची भविष्यवाणी; घ्या जाणून

गूढवादी बल्गेरियन बाबा वांगा (Bulgarian mystic Baba Vanga) हे नॉस्ट्राडेमस (Nostradamus) प्रमाणेच प्रसिद्ध आहेत. भविष्यात घडणाऱ्या अनेक घटनांबाबत त्यांनी भविष्य वर्तवले आहे. त्यांनी 5079 सालापर्यंत, जग एका निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचेल असे भाकीत बाबा वांगा यांनी केले आहे. बाबा वांगा यांनी वर्तवलेल्या 2023 या नव्या वर्षाबद्दलच्या भविष्यातही चर्चा सुरु झाली आहे.

Representative Image (Photo Credit- Twitter/Wikimedia Commons)

गूढवादी बल्गेरियन बाबा वांगा (Bulgarian mystic Baba Vanga) हे नॉस्ट्राडेमस (Nostradamus) प्रमाणेच प्रसिद्ध आहेत. भविष्यात घडणाऱ्या अनेक घटनांबाबत त्यांनी भविष्य वर्तवले आहे. त्यांनी 5079 सालापर्यंत, जग एका निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचेल असे भाकीत बाबा वांगा यांनी केले आहे. बाबा वांगा यांनी वर्तवलेल्या 2023 या नव्या वर्षाबद्दलच्या भविष्यातही चर्चा सुरु झाली आहे. बाबा वांग यांनी 2023 साठी वर्तवून ठेवलेल्या भयावह अंदाजांमध्ये पृथ्वीच्या कक्षेतील बदलाचा समावेश आहे. जो जागतिक अणुस्फोटामुळे होऊ शकतो. सौर वादळ, जे पृथ्वीवरील किरणोत्सर्गाची पातळी वाढवेल, असे बाबा वांगा यांनी म्हटले आहे.

  • बाबा वांगा यांच्या मते, 2023 मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामीमुळे पृथ्वीच्या चुंबकीय अवरणाचे मोठे नुकसान होईल.एलियन्सने हल्ला केल्यास पृथ्वीवरील लाखो लोकांचा नाश होईल, असेही त्यांनी म्हटले. (हेही वाचा, Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची धक्कादायक भविष्यवाणी; दोन महिन्यांत भारतात येऊ शकतं 'हे' मोठं संकट)
  • बाबा वांगाच्या भविष्यवाणीनुसार 2023 मध्ये पृथ्वीची कक्षा "बदलेल". पृथ्वी आणि तिचे वैश्विक वातावरण यांच्यातील समतोलामुळे, पृथ्वीच्या तापमानावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. अशावेळी परिस्थिती खूपच चिंताजनक असेल.
  • 2023 पर्यंत प्रयोगशाळेत मानव तयार केले जातील. जन्माला येण्याआधीच त्यांच्या न जन्मलेल्या मुलाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये सानुकूलित करण्याचा पर्याय पालकांकडे असेल. हे आढळून आल्यावर सरोगसीचा प्रश्न सुटेल आणि बाळंतपणाची प्रक्रिया मानवी नियंत्रणाखाली येईल. वांगाच्या म्हणण्यानुसार, भविष्यातील लोक घरी नाही तर प्रयोगशाळेत जन्माला येतील.

जर एखाद्या पॉवर प्लांटचा स्फोट झाला तर त्याचा परिणाम म्हणून विषारी ढग संपूर्ण आशिया खंडाला धुक्याच्या दाट आच्छादनात आच्छादून टाकतील. या बदलाचा परिणाम म्हणून गंभीर संक्रमण इतर राष्ट्रांमध्ये पसरले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now