Baba Vanga Predictions 2023: बाबा वेंगा यांनी 2023 साठी केल्या अतिशय भयानक भविष्यवाण्या; होऊ शकतो विनाश, जाणून घ्या सविस्तर

बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा उर्फ ​​बाबा वंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिष होत्या. बाबा वेंगा यांचे 1996 साली निधन झाले. त्यांची भविष्यवाणी कुठेही लिहिलेली नाही.

Baba Vanga Predictions 2023: बाबा वेंगा यांनी 2023 साठी केल्या अतिशय भयानक भविष्यवाण्या; होऊ शकतो विनाश, जाणून घ्या सविस्तर
Baba Vanga (Photo Credits: Twitter)

जगातील प्रसिद्ध ज्योतिष बाबा वेंगा (Vangeliya Pandeva Gushterova) यांनी आगामी दशके आणि शतकांसाठी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. बाबा वेंगाची अनेक भाकिते खरी ठरली आहेत, अशा परिस्थितीत प्रत्येक वर्षी त्यांच्या भाकितांमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण होते. 2022 मध्ये, बाबा वेंगा यांचे आतापर्यंत 2 अंदाज खरे ठरले आहेत. आता 2023 साली बाबा वेंगा यांच्यामते देशात आणि जगात काय होणार, अशी उत्सुकता लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.

बाबा वेंगा यांनी 2023 या वर्षासाठीही अनेक भाकिते केली आहेत. यापैकी 5 भविष्यवाण्या अशा आहेत, ज्या खरे ठरल्याने संपूर्ण जग उलटू शकते. या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या तर मानवजातीचे मोठे नुकसान होईल. बाबा वेंगा यांच्या मते 2023 हे वर्ष खूप धोकादायक ठरणार आहे. कारण या वर्षी केवळ कोणा एका देशालाच नाही तर संपूर्ण पृथ्वी ग्रहाला धोका आहे. पुढील वर्षी मोठी खगोलीय घटना पृथ्वीची कक्षा बदलेल. पृथ्वीच्या वेगात एवढा मोठा बदल झाला तर त्याचे मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. लोकांच्या मते, या बदलामुळे आपत्तीसारखी परिस्थिती उद्भवू शकते.

2023 साठीच्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या-

  • बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, एक मोठा देश जैविक शस्त्रांनी लोकांवर हल्ला करेल. सध्याची परिस्थिती पाहिली तर रशिया-युक्रेन युद्ध संपूर्ण जगासाठी धोक्याचे बनले आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अनेकवेळा अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे.
  • बाबा वेंगा यांच्या मते, 2023 मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येऊ शकते. या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीवर परिणाम होईल आणि त्यामुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
  • बाबा वेंगा यांच्या मते, 2023 मध्ये संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
  • अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे विषारी ढग आशिया खंडावर येतील. यामुळे जगातील अनेक देश गंभीर आजारांच्या विळख्यात येऊ शकतात.
  • बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2023 पर्यंत मानव प्रयोगशाळेत जन्माला येईल. प्रयोगशाळेत लोकांचे चारित्र्य, त्वचेचा रंग ठरवला जाईल. म्हणजेच जन्माची प्रक्रिया ही पूर्णपणे नियंत्रित प्रक्रिया असेल. (हेही वाचा: South Korea: दक्षिण कोरियाची राजधानी सेयूलमध्ये भीषण दुर्घटना! हॅलोवीन फेस्टीव्हमध्ये चेंगराचेंगरीत १४९ जणांचा मृत्यू)

दरम्यान, बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, माणूस लवकरच इतका प्रगती करेल की तो 2028 मध्ये शुक्र ग्रहावर पोहोचेल. बाबा वेंगा यांनी वर्तवलेला 80 टक्के अंदाज खरा ठरला आहे. सोव्हिएत युनियनचे विघटन, 9/11 चा दहशतवादी हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू अशा अनेक गोष्टींचे भाकीत बाबा वेंगा यांनी केले होते, जे अगदी खरे ठरले.

बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा उर्फ ​​बाबा वंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिष होत्या. बाबा वेंगा यांचे 1996 साली निधन झाले. त्यांची भविष्यवाणी कुठेही लिहिलेली नाही. म्हटले जाते की त्यांनी या भविष्यवाण्या त्यांच्या अनुयायांना तोंडी सांगितल्या होत्या.

(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2022 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).