नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करताच पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; पहा हे Funny Memes
यातील काही मिम्स आपणही पाहुयात..
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना चौथ्या लॉकडाउन (Lockdown) सोबतच आर्थिक पॅकेज संदर्भात एक महत्वाची घोषणा केली. मोदींनी 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करून कोरोनाशी लढा देण्यास भारत सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला. राजकीय, आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या अशा या घोषणेनंतर सोशल मीडियावर मात्र वेगळ्याच चर्चा सुरु आहेत. 20 लाख कोटीचे पॅकेज कौतुकस्पद आहे पण या किंमतीत नेमके किती शून्य येतात असा मजेशीर सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. इतकंच नाही तर या मोठ्या पॅकेजवरून पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान (Pakistan PM Imran Khan) यांना सुद्धा अनेकांनी निशाणा केला आहे. मोदींनी एवढे मोठे पॅकेज घोषित केले असताना इमरान खान यांना त्यावरील शून्य तरी मोजता येतील का अशी खोचक टिपण्णी करणारे जोक्स आणि मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही मिम्स आपणही पाहुयात..
अलीकडे सर्वच परिस्थिती मध्ये सोशल मीडियावर मिम्स च्या माध्यमातून नेटकरी चर्चा करत असतात, यात बहुतांश वेळा इमरान खान हे रडारवर असतातच. मात्र यावेळेस या मिम्स आणि जोक्सला भलतेच उधाण आले आहे. पाकिस्तानमधील एकूणच कोरोनाची स्थिती आणि त्यावर उपचार करायला देण्यात येणारी आर्थिक मदत यावरून निशाण साधत हे मजेशीर मिम्स बनवले गेले आहेत. 20 लाख कोटी मध्ये किती शून्य येतात? ट्वीटर वर आत्मनिर्भर भारत अभियान आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर युजर्सचं गणित सुरू! (पहा धम्माल मिम्स)
इमरान खान यांच्यावर मिम्स
Narendra Modi यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर Aatm Nirbhar Memes चा धुमाकूळ ; पाहा मजेदार मिम्स - Watch Video
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले आर्थिक पॅकेज हे जगातील सर्व कोरोनाबाधित देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचा दावा केला जात आहे. भारताच्या एकूण जीडीपीच्या 10 टक्के हे पॅकेज असणार आहे. ज्यातून, शेतकरी, कामगार, लघु उद्योग, कुटीर उद्योग, जमीन, मोठे व्यवसाय अशा सर्व स्तरावर मदत करून देशाला आत्मनिर्भर बनवले जाईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधणार आहेत.