अश्लील MMS मुळे चर्चेत आलेली अंकिता दवे आता TikTok वर होत आहे व्हायरल; पहा व्हिडिओ
अंकिता दवे (Image Credit: Instagram)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिक टॉक (TikTok) आज मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले दिसत आहे. आजची तरुण पिढी आपला बराच वेळ टिक टॉकवर घालवते. या अॅपने आज अनेकांना स्टार बनविले आहे आणि म्हणूनच काही सितारेही त्यांची लोकप्रियता वाढविण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करताना दिसून येत आहेत. आता यामध्ये अंकिता दवेही (Ankita Dave) सामील झाली आहे. अंकिताने टिक टॉकचा वापर करण्याचे प्रमाण वाढवले असून, इथे तिला भरभरून चाहते मिळत आहेत. सध्या अंकिताचे टिक टॉकवर जवळजवळ 25 लाख फॉलोवर्स आहेत.

आता अशी परिस्थिती आहे की, अंकिताने टिक टॉकवर व्हिडीओ पोस्ट करताच तो व्हायरल आणि ट्रेंडिंग व्हायला सुरुवात होते. अंकिताबद्दल बोलायचे झाले तर, ती एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 2017 साली जेव्हा एक एमएमएस व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा अंकिता पहिल्यांदा चर्चेत आली. या व्हिडिओमध्ये असा दावा केला गेला होता की, या व्हिडीओमधील मुलगी ही अंकिता आहे, जीचे आपल्या दूरच्या भावासोबत चुकीचे संबंध आहेत.

अंकिताचीचे इन्स्टाग्रामवरही बरेच बरेच फॅन फॉलोइंग आहे. अंकिता नेहमीच तिचे हॉट आणि सेक्सी फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना ट्रीट देत असते. दरम्यान, अंकिता गुजरातच्या राजकोट येथे जन्मली असून, तिने मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. अंकिताने अनेक मॉडेलिंग असाईनमेंट्स केल्या आहेत. यासह तिने उल्लु अॅप प्रसारित होणाऱ्या श्रृंगारदान या वेबसीरिजमध्येही काम केले आहे.