Andhra Pradesh च्या प्रभाकर रेड्डी ने एका मिनिटांत डोक्याने उघडली 68 बाटल्यांची झाकणं; अनोख्या पराक्रमाची Guinness Book मध्ये नोंद (Watch Video)

या पराक्रमामुळे त्याच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. प्रभाकर रेड्डीने एका मिनिटांत चक्क डोक्याने 68 बाटल्यांची झाकणं उघडली आहेत.

Prabhakar Reddy P Record (Photo Credits: Twitter)

आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) प्रभाकर रेड्डी (Prabhakar Reddy) ने एक आगळवेगळा पराक्रम केला आहे. या पराक्रमामुळे त्याच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness Book of World Record) मध्ये करण्यात आली आहे. प्रभाकर रेड्डीने एका मिनिटांत चक्क डोक्याने 68 बाटल्यांची झाकणं उघडली आहेत. Guinness World Records 2021 Out Now या ट्विटर हँडलवर प्रभाकरचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "हे घरी करु नका. एका मिनिटांत डोक्याने 68 बाटल्यांची झाकणं उघडण्याचा विक्रम प्रभाकर रेड्डी यांनी केला आहे.  नेल्लोरच्या सुजित कुमार ई आणि राकेश बी यांच्या साहाय्याने प्रभाकर रेड्डी यांनी हा मान मिळवला आहे."

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, प्रभाकरचे मित्र देखील बाटल्या देण्यात ठेवण्यात मदत करत आहेत. तर एक मित्र बाटल्यांची झाकणं गोळा करत आहे. प्रभाकरच्या या पराक्रमाचे भरभरुन कौतुक करताना त्याच्या मित्रांनी दिलेल्या साथीला विसरुन चालणार नाही. परंतु, अशा प्रकारचे स्टंट्स तुम्ही चुकूनही घरी करु नका. कारण प्रभाकरने खूप सराव आणि मेहनतीनंतर हा पराक्रम केला आहे. त्याची नक्कल करणे घातक ठरु शकते. (केरळ च्या व्यक्तीने 60 हजार मधमाश्या 4 तास चेहऱ्यावर चिकटवून केला होता हटके विक्रम, Watch Video)

Guinness World Records 2021 Tweet:

यापूर्वी देखील अनेकांनी विविध पराक्रम रचत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले आहे. उंचावरुन उडी मारणे, डोक्याने विटा फोडणे, दातांनी कार खेचणे असे अनेक स्टंड्स तुम्ही पाहिले असतील.