Conjoined Twins Sohna and Mohna Got Jobs: दोन भाऊ एक शरीर, आईवडीलांनी सोडून दिलेल्या जुळ्या भावंडांना PSPCL मध्ये नोकरी

पंजाबमधील प्रसिद्ध जुळे (Twin Siblings) भावंड सोहना आणि मोहना (, Sohna and Mohna) यांना सरकारी नोकरी मिळाली आहे. जन्मापासूनच कमेरपासून वरचे शरीर वेगळे मात्र कमरेपासून खाली एकच शरीर असलेली ही दोन्ही जुळी (Conjoined Twin) भावंडे प्रदीर्घ काळापासून नोकरीच्या प्रतिक्षेत होती.

Twin Siblings Sohna and Mohna | (Photo Credit - ANI/Twitter)

पंजाबमधील प्रसिद्ध जुळे (Twin Siblings) भावंड सोहना आणि मोहना (, Sohna and Mohna) यांना सरकारी नोकरी मिळाली आहे. जन्मापासूनच कमेरपासून वरचे शरीर वेगळे मात्र कमरेपासून खाली एकच शरीर असलेली ही दोन्ही जुळी (Conjoined Twin) भावंडे प्रदीर्घ काळापासून नोकरीच्या प्रतिक्षेत होती. अखेर पंजाब (Punjab) राज्यातील अमृतसर (Amritsar) येथील या जुळ्या भावंडांना पंजाब स्टेट पावर कॉरपोरेशन लिमिटेड (PSPCL) मध्ये नोकरी मिळाली आहे.

इथल्या अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 19 वर्षीय सोहना याला सरकारी नोकरी मिळाली आहे. त्याने 20 डिसेंबरपासून काम करण्यास सुरुवात केली आहे. तो महना याच्यासोबत पीएसपीसीएलमध्ये विद्यूत उपकरणांची देखभाल करतो. (हेही वाचा, The boy born with a TAIL: ब्राझीलमध्ये जन्मले शेपटीवाले बाळ, डॉक्टर्स आश्चर्यचकीत)

Twin Siblings Sohna and Mohna | (Photo Credit - ANI/Twitter)

स्टेट पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरी मिळाल्याने दोन्ही जुळे भाऊ खुश आहेत.

Twin Siblings Sohna and Mohna | (Photo Credit - ANI/Twitter)

दोन्ही भावांनी नोकरी दिल्याबद्दल पंजाब सरकारला धन्यवाद दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, 'नोकरी दिल्याबद्दल आम्ही खूप खूष आहोत. 20 डिसेंबरपासून आम्ही काम करणे सुरुही केले आहे.

Twin Siblings Sohna and Mohna | (Photo Credit - ANI/Twitter)

'आम्ही पंजाब सरकार आणि पिंगलवाडा संस्थानचे आभार मानतो. ज्यांनी आम्हाला या काळात शालेय शिक्षण दिले', असेही या दोन भावंडांनी म्हटले आहे.

Twin Siblings Sohna and Mohna | (Photo Credit - ANI/Twitter)

सोहना आणि मोहना हे या परिसरात प्रसिद्ध आहेत.

PSPCL चे सबस्टेशन कनिष्ट अभियंता रविंदर कुमार यांनी म्हटले की, सोहना-मोहना हे विद्यूत उपकरणांची देखभाल करण्याच्या कामात आम्हाला मदत करतात. पंजाब सरकारनेच त्यांना नोकरी दिली आहे. सोहना याला काम मिळाले आहे आणि मोहना त्याला मदत करतो. त्यांच्याकडे कामाचा अनुभवही आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now