Fact Check: गृहमंत्री अमित शाह हाडांच्या कॅन्सरने त्रस्त आहेत? त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फेक ट्वीट मागील सत्य, घ्या जाणून
विशेषतः व्हॉट्सअॅपवर याचा अधिक प्रसार आहे. व्हायरल होणारे हे ट्विट अमित शहा यांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारे आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाने एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेषतः व्हॉट्सअॅपवर याचा प्रसार अधिक आहे. व्हायरल होणारे हे ट्विट अमित शहा यांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारे आहे. या ट्विटमध्ये अमित शाह यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे हे ट्विट खुद्द अमित शाह यांनी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे झपाट्याने व्हायरल होणाऱ्या या ट्विटमुळे एकच गोंधळ उडाला आहे. या ट्विटमध्ये अमित शाह यांना हाडांचा कॅन्सर झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अशा प्रकारचे कोणतेही ट्विट केले नाही याची खात्री लेटेस्टली तुम्हाला देत आहे.
या ट्विट मध्ये म्हटले आहे की, "माझ्या सर्व देश बांधवांनो, माझ्या आयुष्यातील सर्व काम मी केवळ देशाच्या हितासाठी केले आहे. कुठल्याही जाती किंवा धर्माशी माझे वैर नाही. माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी गेल्या काही दिवसांपासून देशाची सेवा करु शकलो नाही. मला हे सांगताना खूप दुःख होत आहे की, मला हाडांचा कॅन्सर झाला आहे. या रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव देखील माझ्यासाठी प्रार्थना करतील अशी मी आशा व्यक्त करतो. मी लवकरच देशाच्या सेवेसाठी हजर होईन."
सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट खरी असल्याचा समज करुन घेत अनेक लोक याला बळी पडत आहेत. त्यामुळे अमित शाह यांच्या प्रकृती बाबतची ही खोटी माहिती सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. परंतु, अमित शाह यांच्या ट्विटर अकाऊंटवर अशी कोणतीही पोस्ट करण्यात आलेली नाही. हे फोटोशॉप केलेले ट्विट आहे. कोरोना व्हायरसच्या संकटकाळात अमित शाह हे फारसे मीडिया समोर आले नाहीत, त्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती गंभीर आहे. अशा गंभीर काळात आपल्याला त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेणे जास्त गरजेचे आहे. त्याचबरोबर सरकारने त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती द्यावी, असे गौरव पांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ट्विट:
अमित शाह यांचा लेटेस्ट फोटो पाहिला असता त्यांचे वजन कमी झाल्याचे चकटन समजते. तसेच ते काहीसे थकल्यासारखेही दिसत आहेत. यापूर्वी देखील अमित शाह यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची फेक न्यूज सोशल मीडियात परसली होती. या फेक न्यूजमध्ये अमित शाह यांच्या इटली दौऱ्यानंतर त्यांना कोरोना व्हायरस झाल्याचे म्हटले होते.