Amit Bhadana 20M Subscribers: अमित भडाना ठरला 2 कोटी सबस्क्रायबर मिळवणारा पहिला भारतीय युट्यूबर; जाणून घ्या नेट वर्थ

महत्वाचे म्हणजे युट्युबने याद्वारे पैसे कमावण्याची संधीही उपलब्ध करून दिल्याने,

Amit Bhadana (Photo Credits: Instagram)

युट्युबने (YouTube) अनेकांसाठी आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले व आता याच्या जोरावर अनेक लोक सेलेब्ज बनले आहेत. महत्वाचे म्हणजे युट्युबने याद्वारे पैसे कमावण्याची संधीही उपलब्ध करून दिल्याने, तरुणाईचा ओढ याकडे असलेला दिसून येत आहे. अलीकडेच एका भारतीय युट्यूबवरने आपले 20 मिलियन म्हणजेच, 2 कोटी सबस्क्रायबर बनवण्याची कामगिरी केली आहे. अमित भडाना (Amit Bhadana) असे या युट्युबरचे नाव असून, हा युट्युबर पहिला स्वतंत्र भारतीय व्यक्ती आहे जिचे इतके सबस्क्रायबर झाले आहेत. या कामगिरीबद्दल अमितने एका ट्विटमध्ये आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

गेल्या काही वर्षांत अमित आणि त्याचे यूट्यूब चॅनेल फारच लोकप्रिय ठरले आहे. याद्वारे त्याने आपल्या चाहत्यांचा एक मोठा बेस तयार केला आहे. त्याचे विनोद आणि विनोदी अभिनयाने चात्यांना वेड लावले आहे. त्याच्या कॉमेडीची यूट्यूबसह इतरही सोशल मिडियावर चर्चा आहे. सप्टेंबर 2018 मध्ये, भडानाने 1 कोटीचा आकडा ओलांडला, त्यावेळी तो भुवन बाम (BB ki Vines) च्या अगदी मागे होता. मात्र आत त्याने भुवनलाही मागे टाकत एक नवा विक्रम केला आहे. गेल्या एक वर्ष, आठ महिन्यांपासून भडाना यूट्यूबवर भारतातील सर्वात जास्त सबस्क्रायबर असलेली व्यक्ती राहिला आहे.

(हेही वाचा: TikTok Video साठी कुत्र्याला पाण्यात फेकणाऱ्या तरुणांना शोधण्यासाठी PETA तर्फे 50 हजाराचे बक्षीस जाहीर, पहा व्हिडीओ)

भडाना नंतर कॅरी मिनाटी उर्फ ​​अजय नगर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे 1.93 दशलक्ष सबस्क्रायबर आहेत. त्यानंतर आशिष चंचलानी आणि भुवन बाम हे लोक आहेत. सध्या भुवन बामचे 1 कोटी 76 लाख सबस्क्रायबर, आशिष चंचलानीचे 1 कोटी 84 लाख सबस्क्रायबर आहेत. अहवालानुसार अमित भडानाची एकूण मालमत्ता अंदाजे 43.70 कोटी रुपये इतकी आहे. या यूट्यूब स्टारने अक्षय कुमार, अजय देवगण यांसह अनेक सेलेब्जसोबत व्हिडिओ बनवले आहेत. अमित भडानाने 24 ऑक्टोबर 2012 रोजी आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले, मात्र 1 मार्च 2017 पासून त्याने फुल फ्लेजेड व्हिडिओ पोस्ट करणे सुरु केले.