Adorable Aadhaar Photoshoot: आधार कार्डसाठी फोटो काढताना मॉडेलींग, नेटीझन्सना आठवली 'Parle G Girl', चिमूकलीचा फोटो व्हायरल (Watch Video)
एका लहान मुलीला मात्र आधार कार्डवर तिचा फोटो सुंदर यावा त्यासाठी छान पोझ असावी असे वाटते. त्यासाठी ती कॅमेऱ्यासमोर इतक्या सुंदर पोझ देत आहे की, ते पाहून अनेकांना 'पार्ले जी गर्ल' ('Parle G Girl') आठवली आहे. या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
आधार कार्ड (Aadhaar) आणि पॅन (PAN) कार्ड यावरील फोटो ओळखा आणि बक्षीस जिंका, असा टोमणा किंवा खिल्ली अनेकदा उडवली जाते. त्यामुळे केवळ एक आवश्यक आणि महत्त्वाचे कागदपत्र म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. त्यावरचा फोटो (Aadhaar Photoshoot) विशेष चांगला यावा यासाठी खास प्रयत्न केले जात नाहीत. असे असले तरी एका लहान मुलीला मात्र आधार कार्डवर तिचा फोटो सुंदर यावा त्यासाठी छान पोझ असावी असे वाटते. त्यासाठी ती कॅमेऱ्यासमोर इतक्या सुंदर पोझ देत आहे की, ते पाहून अनेकांना 'पार्ले जी गर्ल' ('Parle G Girl') आठवली आहे. या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
छोटी मॉडेल
आधार नोंदणी केंद्रावर या गोंडस मुलीचा फोटो घेण्यासाठी ऑपरेटर प्रयत्न करत आहेत. ऑपरेटर तिचा फोटो घेण्याची तयारी करत असताना, ही मुलगी स्वत:ला जणू एखाद्या छोट्या सुपरमॉडेलमध्ये बदलते. व्हिडिओमध्ये तिची मोहक पोझची मालिकाच दिसत आहे. ज्यामध्ये या मुलीच्या चेहऱ्यावर हात ठेवून एक गोड स्मितहास्य, एक खेळकर नजर पाहायला मिळते. ती थोडासा डान्सही करते. ते पाहून ऑपरेटर आणि तिचे पालक हसू लागतात. ऑपरेटरनेही तिच्या या लाडीक हालचाली मोठ्या संयमाने पाहात त्याला हवा तसा फटो काढला. (हेही वाचा, Aadhaar Is Most Trusted Digital ID in World: 'आधार हा जगातील सर्वात विश्वसनीय डिजिटल आयडी'; Ministry of Electronics & IT ने फेटाळले Moody’s चे दावे)
सोशल मीडियावरही कौतुकास्पद प्रतिक्रिया
सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवरील बेबीनयशा (BabyNaysha) नावाच्या हँडलने gungun_and_mom नावाच्या पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यावर कॅप्शन लिहीली आहे, "आधार कार्ड फोटोशूट चुकीचे झाले." शेअर केल्यापासून हा व्हिडिओ आतापर्यंत 18.3 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला ‘पार्ले जी गर्ल’ असे टोपणनावही दिले आहे.
व्हिडिओ
इन्स्टाग्रामवरील एका वापरकर्त्याने लिहिले, "तिचा आनंद दर्शवितो की, आईवडील आणि ती असे कुटुंब अत्यंत खूश आहे. तिला कोणीही ओरडत नाही फक्त तिच्यावर प्रेम करतात" दुसऱ्या यूजरने लिहिले, "पार्ले जी गर्ल!" आणखी एकाने म्हटले "खूपच क्यूट, मागच्या उन्हाळ्यात मी माझ्या 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलीला आधार कार्ड फोटोग्राफीसाठी घेऊन गेलो तेव्हा मला हाच अनुभव आला." आणखी एकाने म्हटले "आधार पिक्चरमध्ये फक्त गोंडस दिसणारी मुलगी. फोटोसाठी पोज कसे द्यायचे हे तिला माहित आहे आणि मला अजूनही माहित नाही." दुसरी टिप्पणी वाचली. सोशल मीडियावर या फोटोने अनेकांचे मन जिंकले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)