Snakes Viral Video: 'आस्तीन के सांप ले लो...' हातात डझनभर साप लटकवून विकताना दिसला 'हा' व्यक्ती, पहा व्हिडिओ

हा व्हिडिओ फहाद खान नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, तो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडिओवर लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, 'माझे नातेवाईक तुमच्याकडे कसे गेले.' तर दुसऱ्याने लिहिले आहे की, 'माझ्याकडे ते आहेत, मला नको आहेत.'

Snakes Viral Video: 'आस्तीन के सांप ले लो...' हातात डझनभर साप लटकवून विकताना दिसला 'हा' व्यक्ती, पहा व्हिडिओ
Man Seen Selling Snakes (PC - Instagram)

Snakes Viral Video: तुम्ही अनेकदा फेरीवाले बाजारात विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करताना पाहिलं असेल आणि त्यांच्याकडून कधीतरी काही वस्तूही तुम्ही घेतली असेल. पण, तुम्ही कधी एखाद्याला बाजारात साप (Snake) विकताना पाहिलं आहे का? तुम्ही पाहिले नसेल तर आत्ताच बघा, कारण सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती डझनभर साप हातात घेऊन बाजारात विकताना दिसत आहे. एका व्यक्तीला सापांना सामानाप्रमाणे मनगटावर लटकवून विकताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.

हा व्हिडिओ फहाद खान नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, तो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडिओवर लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, 'माझे नातेवाईक तुमच्याकडे कसे गेले.' तर दुसऱ्याने लिहिले आहे की, 'माझ्याकडे ते आहेत, मला नको आहेत.' (हेही वाचा - Dog And Snake Video: कुत्र्याचा आणि सापाचा संघर्ष, उत्तर प्रदेशातील घटना, Video व्हायरल)

पहा व्हिडिओ  - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Fahad Khan (@fadi_wri8s_)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला डझनभर साप हातात लटकवून मोठ्याने ओरडून त्यांची विक्री करत आहे. त्या व्यक्तीच्या एका हातात साप लटकवलेले आहेत. ती व्यक्ती ओरडत म्हणत आहे, 'आस्तीन के सांप ले लो...' हे दृश्य तेथील सर्वांसाठीचं धक्कादायक होतं. लोक या व्यक्तीकडे आश्चर्यकारक नजरेने पाहत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2024 04:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).