Aaliyah Kashyap Bold Bikini Photo: इनरवेअर ब्रँडसाठी अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने केले बोल्ड बिकिनी फोटोशूट; फिगर पाहून चाहते घायाळ
Aaliyah Kashyap (Photo Credit : Instagram)

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या एन्ट्रीचा काळ सुरू आहे. बरेच स्टार किड्स त्यांच्या अभिनयाने लोकांना इम्प्रेस करण्यात यशस्वी ठरले आहेत, तर काहींनी त्यांचे लुक्स व स्टाईलमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या इंडस्ट्रीमध्ये अशाच एका स्टार किड्सची चर्चा सुरु आहे ती म्हणजे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यपची (Aaliyah Kashyap). आलिया सोशल मिडियावर बरीच सक्रीय आहे. ती नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंच्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा तिने एका फोटोमुळे सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जबरदस्त बोल्ड बिकिनी फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोशूटमध्ये तिने सुपर मॉडलच्या स्टाईलमध्ये सिझलिंग पोज देऊन सर्वांना चकित केले आहे. या फोटोमध्ये आलिया कश्यप फ्लोअरवर बसून फोटोशूटसाठी पोज देताना दिसत आहे. त्याचबरोबर या फोटोत तिचा फिटनेसही उठून दिसत आहे, ज्यामुळे चाहते वेडे झाले आहेत. तिच्या या बोल्ड फोटोमधील खास गोष्ट म्हणजे तिचा आत्मविश्वास. आपल्या स्टाईलमुळे ती मोठ्या मोठ्या सुपर मॉडेल आणि अभिनेत्रींना टक्कर देताना दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

एका इनरवेअर ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी आलियाने या लूकमध्ये फोटो क्लिक केला आहे. आलियाचा हा बोल्ड फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोवर तिला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर रिअॅक्शन देखील मिळत आहे. यासोबतच इतर बऱ्याच स्टार किड्सनेही यावर कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, आलिया कश्यप ही अनुराग कश्यप आणि त्यांची पहिली पत्नी आरती बजाज यांची मुलगी आहे. आरती बजाज चित्रपट संपादक राहिल्या आहेत. 2009 मध्ये अनुराग आणि आरती यांचा घटस्फोट झाला.