Viral Video: भोपाळ रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमधून तरुणाला कॉलरला पकडून खेचले; पहा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ
त्यानंतर काही वेळानंतर आरोपीने त्याला सोडून दिले. हा सर्व प्रकार स्टेशनवरील लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
Viral Video: भोपाळ रेल्वे स्थानकावर (Bhopal Railway Station) थांबलेल्या प्रवाशांना गुरुवारी एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. चालत्या ट्रेन (Moving Train) मध्ये दोन बदमाशांनी एका तरुणाला प्लॅटफॉर्मच्या काठावर ओढत नेले. आरोपीने पीडित तरुणाला कॉलरने इतक्या निर्दयीपणे ओढले गेले की, तो चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील दरीमध्ये खाली पडता-पडता वाचला. त्यानंतर काही वेळानंतर आरोपीने त्याला सोडून दिले. हा सर्व प्रकार स्टेशनवरील प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
भोपाळ रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर ही घटना घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'भोपाळ हायलाइट्स' या इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये, चालत्या ट्रेनच्या आत एक बदमाश तरुणाची कॉलर पकडून त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने ट्रेनखाली ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. (हेही वाचा - Cockroach Found in Meal on Train: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिल्या गेलेल्या अन्नामध्ये प्रवाशाला आढळले मृत झुरळ; IRCTC ने माफी मागितली (See Pics))
पहा व्हिडिओ -
रेल्वे स्थानकावरील लोक हल्लेखोरावर ओरडताना दिसत आहेत. ज्यानंतर आरोपीने पीडित तरुणाला प्लॅटफॉर्मवर कोणतीही हानी न करता सोडून दिले. भोपाळ हायलाइट्सने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. बुधवारी दुपारी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.