IPL Auction 2025 Live

Royal Bengal Tiger Viral Video: रॉयल बंगाल टायगरने पोहत ओलांडली ब्रह्मपुत्रा नदी; व्हिडिओ व्हायरल

होय तब्बल 10 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याने यशस्वीरित्या हे मार्गक्रमण पूर्ण केले आणि तो प्राणीसंग्रहालयात गेला. रॉयल बंगाल टायगर (Royal Bengal Tiger) असे या वाघाचे नाव आहे.

Royal Bengal Tiger (Photo Credit- Twitter)

Royal Bengal Tiger Viral Video: एका वाघाने चक्क 120 किलोमीटर अंतर पोहत ब्रम्हपुत्रा नदी (Brahmaputra River) पार केली आहे. होय तब्बल 10 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याने यशस्वीरित्या हे मार्गक्रमण पूर्ण केले आणि तो प्राणीसंग्रहालयात गेला. रॉयल बंगाल टायगर (Royal Bengal Tiger) असे या वाघाचे नाव आहे. नदी पोहत पार करतानाचा या वाघाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अर्थात यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांचीही मोठी भमिका आहे.

व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकता एक वाघ ब्रम्हपुत्रा नदीत पोहतो आहे. त्याच्या पोहण्याचा वेगही वाखाणन्याजोगा आहे. नदीतून पार पडताच हा वाघ प्राचीन उमानंद मंदिरासाठी (Umananda Temple) प्रसिद्ध असलेल्या गुवाहाटीजवळील मोर बेटावरील एका अरुंद गुहेत लपताना दिसत आहे. बेटावरील एका अरुंद गुहेकडे पोहत जातना वाघ व्हिडिओत दिसतो. जिथे दररोज असंख्य भाविक येतात.

वन अधिकाऱ्यांना संशय आहे की, हा वाघ रंगा राष्ट्रीय उद्यानातून भटकला असावा. जे गुवाहाटी शहरापासून ब्रह्मपुत्रा ओलांडून बोटीने 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बेटापासून सुमारे 120 किमी अंतरावर आहे. बहुदा पाणी पिण्यासाठी हा वाघ ब्रम्हपुत्रा नदीत आला असावा आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो वाहून गेला असावा. (हेही वाचा, Tiger Fight Video: वाघाला भिडला वाघ, झुंज दोन वाघांची; डरकाळी सोबत नैसर्गिक संघर्षाची जबरदस्त झलक, पाहा व्हिडिओ)

दरम्यान, वाघाचा वावर आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर स्थानिक पोलिसांसह नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या एका तुकडीला सतर्क करण्यात आले. वनविभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकांसह बचाव पथक बोटीतून घटनास्थळी दाखल झाले.

ट्विट

वाघाला पकडणे आवश्यक होते. मात्र, वाघ नदीकाठापासून काही अंतरावर असल्याने त्याला पकडणे कठीण होते. वाघ दोन मोठ्या खडकांमध्ये होता. बचाव पथकाला अत्यंत सावधपणे पावले टाकत ही वाघाला पकडण्याची मोहीम राबवावील लागली, असे पीटीआय या वृत्तसंस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले.