Mouse Jumps Out Of Meal Served Mid-Flight: विमानात देण्यात येणाऱ्या जेवणात उंदराने मारली उडी; एअरलाइनने केले फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग
नॉर्वेची राजधानी ओस्लो ते स्पेनमधील मलागा या विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाला त्याच्या जेवणात जिवंत उंदीर आढळल्याने विमान कोपनहेगनच्या दिशेने वळवावे लागले. 18 सप्टेंबर रोजी झालेल्या या धक्कादायक घटनेनंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
Mouse Jumps Out Of Meal Served Mid-Flight: आतापर्यंत तुम्ही विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आल्याच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील. परंतु स्कॅन्डिनेव्हियन एअरलाइन्सच्या (एसएएस) फ्लाइटला चक्क उंदरामुळे (Mouse) आपत्कालीन लँडिंग करावे लागले. नॉर्वेची राजधानी ओस्लो ते स्पेनमधील मलागा या विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाला त्याच्या जेवणात जिवंत उंदीर (Living Mouse) आढळल्याने विमान कोपनहेगन (Copenhagen) च्या दिशेने वळवावे लागले. 18 सप्टेंबर रोजी झालेल्या या धक्कादायक घटनेनंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने एएफपी या वृत्तसंस्थेला याची पुष्टी केली आणि सांगितले की, उंदीर सुरक्षा धोका निर्माण करत होता. विमानात बसलेल्या जार्ले बोरेस्टॅड या प्रवाशाने ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. बोरेस्टॅडने लिहिले, 'विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ. माझ्या शेजारी बसलेल्या एका महिलेने तिचे अन्न उघडले आणि त्यातून एक उंदीर बाहेर आला. आता आम्ही माघारी फिरलो आणि फ्लाइट बदलण्यासाठी सीपीएच (कोपनहेगन एअरपोर्ट) वर उतरलो.' (हेही वाचा -Scientists Grow Mouse Embryos In Space: शास्त्रज्ञांनी प्रथमच अंतराळात विकसित केले उंदराचे भ्रूण; मानवाचे अवकाशात पुनरुत्पादन करणे होणार शक्य?)
विमानात देण्यात येणाऱ्या जेवणात आढळला जिवंत उंदीर -
त्याचवेळी एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानात उंदरांबाबत कठोर नियम आहेत. एअरलाइन्स त्यांच्या फूड डिलिव्हरी पार्टनरसह याबाबत चर्चा करतील, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. कोणत्याही प्लाइटमध्ये उंदरांबाबत सावधगिरी बाळगली जाते. कारण उंदिरांनी विमानातील विजेच्या तारांना चावल्या तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. (हेही वाचा - Dead Mouse Found in Barbeque Nation Veg Meal Box? मुंबईच्या बार्बेक्यू नेशनच्या शाकाहारी जेवणामध्ये मृत उंदीर आढळल्याचा दावा; दूषित अन्न खाल्ल्यानंतर व्यक्ती रुग्णालयात दाखल)
एसएएसच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही घटना एअरलाइनच्या कार्यपद्धतीनुसार हाताळण्यात आली. या घटनेनंतर विमान वळवण्यात आले आणि प्रवाशांना दुसऱ्या विमानातून मलागा येथे नेण्यात आले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)