Ratan Tata’s Portrait With Diamonds: सुरतमधील ज्वेलर्सने 11000 हिऱ्यांपासून बनवले रतन टाटांचे पोर्ट्रेट; महापुरुषाला वाहिली रत्नजडित श्रद्धांजली, पहा व्हिडिओ
विपुलभाई जेपीवाला असे हे पोर्ट्रेट बनवणाऱ्या कलाकाराचे नाव आहे. जेपीवाला यांनी दिवंगत रतन टाटाजींचे हिऱ्यांच्या साहाय्याने मोठे पोर्ट्रेट बनवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Surat Jeweller Crafts Ratan Tata’s Portrait With Diamonds: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून संपूर्ण देशाचे डोळे पाणावले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश आणि भारतातील लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले. त्यांच्या निधनानंतर लोक त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहेत. रतन टाटा हे या देशासाठी अमूल्य रत्न होते. परंतु, भारताने हे रत्न गमावले.
सूरतच्या कलाकाराने हिऱ्यापासून बनवले रतन टाटांचे पोर्ट्रेट -
भारतातील लोक रतन टाटाजींना कधीही विसरणार नाही. आजही लोक त्यांचे स्मरण करत असून आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अशातचं आता सूरतच्या एका हिरे व्यापाऱ्याने 11000 अमेरिकन हिऱ्यांच्या मदतीने रतन टाटाजींचे अप्रतिम पोर्ट्रेट बनवले (Surat Jeweller Crafts Ratan Tata’s Portrait With Diamonds) आहे. विपुलभाई जेपीवाला असे हे पोर्ट्रेट बनवणाऱ्या कलाकाराचे नाव आहे. जेपीवाला यांनी दिवंगत रतन टाटाजींचे हिऱ्यांच्या साहाय्याने मोठे पोर्ट्रेट बनवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (हेही वाचा -Ratan Tata Visionary Leader: रतन टाटा, कारकीर्द आणि व्यक्तीमत्त्वाचे पैलू)
रतन टाटांचे पोर्ट्रेट बनवण्यासाठी 11000 हिऱ्यांचा वापर, पहा व्हिडिओ -
रतन टाटा यांचे पोर्ट्रेट बनवणाऱ्या या कलाकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कलाकाराने लहान अमेरिकन हिऱ्यांनी त्यांचे मोठे चित्र बनवले आहे. रतन टाटा यांचे हे पोर्ट्रेट हुबेहुब दिवंगत रतन टाटा यांच्यासारखे दिसते. हिऱ्यांसह केलेल्या या किचकट कामासाठी कलाकाराची सर्वत्र स्तुती होत आहे. टाटा यांचे हे पोर्ट्रेट अतिशय अप्रतिम असून ते व्हिडिमध्ये चमकताना दिसत आहे. रतन टाटा या जगात नसले तरी लोकांच्या हृदयात ते सदैव जिवंत राहतील.
रतन टाटांच्या पोर्ट्रेटचा व्हिडिओ पाहून नेटीझन्स भावूक -
रतन टाटा यांच्या पोर्ट्रेटचा व्हायरल व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हिऱ्यांनी बनवलेले दिवंगत रतन टाटाजींचे हे चित्र पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. नेटीझन्स हे पोर्ट्रेट तयार करणारे व्यापारी आणि कलाकार विपुलभाई जेपीवाला यांचे कौतुक करत आहेत. त्याचवेळी, हे पोर्ट्रेट पाहिल्यानंतर, रतन टाटाजींची आठवण करून अनेक लोक खूप भावूक झाले असून त्यांनी कमेंट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.