Greater Noida Animal Cruelty Video: अल्पवयीन मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला उंच इमारतीवरून फेकलं; FIR दाखल, पहा व्हिडिओ
ग्रेटर नोएडातील टॉवर आर-14, एव्हेन्यू गौर सिटी-2 येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलाने एका कुत्र्याच्या पिल्लाला उंच इमारतीवरून फेकून दिल्याचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एनजीओ पीपल फॉर ॲनिमल्स (पीएफए) च्या स्वयंसेवकाने या प्रकरणाविरुद्ध तक्रार दाखल केली, त्यानंतर ग्रेटर नोएडा पोलिसांनी एफआयआर दाखल केला.
Greater Noida Animal Cruelty Video: एका अल्पवयीन मुलाने एक महिन्याच्या पिल्लाला उंच इमारतीवरून फेकून दिलं. याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर रविवारी ग्रेटर नोएडातील (Greater Noida) सोसायटीत निदर्शने करण्यात आली. एव्हेन्यू गौर सिटी-2 मधील रहिवाशांनी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांबाबत तक्रार केली. ग्रेटर नोएडातील टॉवर आर-14, एव्हेन्यू गौर सिटी-2 येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलाने एका कुत्र्याच्या पिल्लाला उंच इमारतीवरून फेकून दिल्याचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एनजीओ पीपल फॉर ॲनिमल्स (पीएफए) च्या स्वयंसेवकाने या प्रकरणाविरुद्ध तक्रार दाखल केली, त्यानंतर ग्रेटर नोएडा पोलिसांनी एफआयआर दाखल केला.
एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, अंदाजे 9-10 वर्षे वयोगटातील मुलाने, प्रौढ व्यक्तीच्या कथित देखरेखीखाली, कुत्र्याच्या पिल्लाला झुडूपातून उचलले आणि निर्दयपणे इमारतीबाहेर फेकले. एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, ही घटना व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्यात आली होती, ज्यामुळे इतरांना त्याचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित केले जाते. (हेही वाचा -Dog Attacking 2 Year Old Video: गाझियाबादमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत कायम; गार्डनमध्ये खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या मुलाचा 4 कुत्र्यांनी घेतला चावा, Watch Video)
मात्र, एव्हेन्यू गौर सिटी-2 मधील रहिवाशांनी एफआयआरला विरोध करत भटक्या कुत्र्यांना परिसरातून हटवण्याची मागणी केली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रहिवाशांनी आरोप केला आहे की, कुत्र्यांनी सोसायटीतील लहान मुले आणि प्रौढांवर हल्ला केला. तथापी, एफआयआरमध्ये, मुलाला बाल न्यायालयासमोर हजर करून त्याची मानसिक स्थिती तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (हेही वाचा -Chandigarh Dog Attack: भटक्या कुत्र्यांने पाठलाग केल्याने 10 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, (Watch Video))
पहा व्हिडिओ -
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, याच सोसायटीत काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने जाणूनबुजून एका पिल्लाला त्याच्या वाहनाखाली चिरडले होते. दुसरे पिल्लू संशयास्पद स्थितीत मृत आढळले होते. पीएफए स्वयंसेविका सुरभी रावत यांनी पीटीआयला सांगितले की, या क्रूर कृत्यामुळे व्हॉट्सॲप ग्रुपवर द्वेष पसरला आहे. आजकाल लहान मुलांकडे फोन आहेत आणि ते प्रौढ व्यक्तींकडून सहज प्रभावित होतात. ज्यामुळे लहान मुलांमध्ये भटक्या प्राण्यांबद्दल द्वेष पसरवण्यास मदत होत आहे.
पीएफए विश्वस्त अंबिका शुक्ला यांनी सांगितलं की, हे एक मनोरुग्ण प्रवृत्ती प्रकट करते ज्याचा तात्काळ सामना करणे आवश्यक आहे. आपण आपल्या स्वतःच्या पूर्वग्रहांनी संपूर्ण पिढी विकृत करू नये.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)