Viral Video: थुंकून रोटी बनवत असणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर लोकांनी व्यक्त केला संताप

व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीचे नाव सोहेल आहे. सोहेल थुंकी लावून रोटी बनवत असताना घटनास्थळावरील उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

Viral Video: थुंकून रोटी बनवत असणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर लोकांनी व्यक्त केला संताप
रोटीवर थूंकणारा व्यक्ती (फोटो क्रेडिट्स: ट्विटर)

Viral Video: सध्या सोशल मीडियावर अत्यंत घृणास्पद व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती थुंकून रोटी बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आपला संताप व्यक्त करीत आहेत. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील एका विवाह सोहळ्यातील असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, ही घटना उघडकीस येताचं पोलिसांना कळविण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण निळ्या रंगाच्या शर्टमधील व्यक्तीला भाकरी बनवत असताना त्यावर थुंकताना दिसत आहे. भाकरी बनवल्यानंतर ही व्यक्ती तंदूरमध्ये रोटी भाजण्यासाठी टाकताना दिसत आहे.

या दरम्यान, तो आपल्यावर कोणी लक्ष तर ठेवत नाही ना? हे पाहत आहे. परंतु, कोणीतरी गुप्तपणे त्याचा व्हिडिओ बनविला आहे. हा व्हिडिओ कुमार आयुष नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांनी या व्यक्तीवर संताप व्यक्त केला आहे. (वाचा - रेस्टॉरंटमध्ये छुप्या पद्धतीने घुसलेल्या पक्षाने चोरले चिप्सचे पाकिट, त्यानंतर झाला फरार; Watch Viral Video)

व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीचे नाव सोहेल आहे. सोहेल थुंकी लावून रोटी बनवत असताना घटनास्थळावरील उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मेरठ पोलिसांनी सांगितलं की, या व्हायरल व्हिडिओचा तपास करण्यासंदर्भात संबंधित पोलिस स्टेशनला सूचना देण्यात आल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2021 03:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).