Viral Video: कुत्र्याने बकरीच्या पिल्लाला बाटलीने पाजले दूध; पहा व्हिडिओ
या व्हिडिओत एक कुत्रा बकरीच्या पिल्लाला दूध पाजताना दिसत आहे. Who’s a good boy? कॅप्शनसह शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला तब्बल 49.6 हजार लोकांनी पाहिला आहे.
सोशल मीडियावर सध्या एक क्युट व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक कुत्रा बकरीच्या पिल्लाला दूध पाजताना दिसत आहे. कुत्रा हा इमानदार, समजूतदार प्राणी असतो हे आपल्याला ठाऊक आहे. त्याच्यात माणुसकी असते हे देखील आपण जाणतो. परंतु, या व्हिडिओतून कुत्र्याचे हे गुण अधिकच अधोरेखित होत आहेत. या कुत्र्याने माणुसकीचे उदाहरण दिले असे म्हणायला हरकत नाही. हा व्हिडिओ डेली गोट्स या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. 'Who’s a good boy?' कॅप्शनसह शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला तब्बल 49.6 हजार लोकांनी पाहिला आहे.
या व्हिडिओत एक कुत्रा दुधाची बाटली तोंडात पकडून बकरीच्या पिल्लाला दूध पाजताना दिसत आहे. या क्यूट व्हिडिओ पाहुन तुम्हालाही नक्कीच छान वाटेल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. या दोन्ही प्राण्यांचा क्युटनेस मनाला भिडतो. प्राण्यांची आवड असणाऱ्यांना विशेषतः कुत्रा हा प्राणी आवडत असलेल्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. (कौतुकास्पद! बिहार येथील प्राणीप्रेमी अख्तर इमाम यांनी आपल्या दोन हत्तीच्या नावे केली संपूर्ण संपत्ती, वाचा सविस्तर)
पहा व्हायरल व्हिडिओ:
हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, व्हिडिओ पाहून हा भारता बाहेरील असावा, असा अंदाज लावला जात आहे. एक प्राण्याने दुसऱ्या प्राण्याला केलेली मदत यापूर्वी अनेक व्हिडिओजमधून आपण पाहिली असेल. प्राण्यांमध्ये असणारी आपुलकी, मदत करण्याची वृत्ती मनुष्याच्या डोळ्यात अंजन घालते. (Swan Makes Woman Wear Her Mask: महिलेला मास्क घालण्याची योग्य पद्धत शिकवणारा हंस सोशल मीडियावर व्हायरल, Watch Video)
यापूर्वी अनेक व्हिडिओजमधून प्राण्यांची हुशारी, आपुलकी आणि स्मार्टनेस आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्राणीप्रेमींसाठी अशा प्रकराचे व्हिडिओ नेहमीच औत्सुक्याचा विषय ठरतात. दरम्यान, सोशल मीडियामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.