रेस्टॉरंटमध्ये छुप्या पद्धतीने घुसलेल्या पक्षाने चोरले चिप्सचे पाकिट, त्यानंतर झाला फरार; Watch Viral Video

ज्यास आतापर्यंत 28.6K व्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर युजर्संनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

चिप्सचं पाकिट चोरणारा पक्षी (Photo Credits: Twitter)

Viral Video: आपण इंटरनेटवर पक्ष्यांचे बरेचं व्हायरल व्हिडिओ (Birds Viral Video) पाहिले असतील. परंतु, पक्षी चोरी करताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये एक पक्षी चिप्सचे पाकिट (Packet of Chips) चोरताना दिसत आहे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी (IPS Officer) दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी या फोटोला 'क्यूटस्ट चोर' (Dipanshu Kabra) असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया वापरकर्त्यांना धक्का बसला आहे. तसेच दुसरीकडे हा व्हिडिओ पाहून नेटीझन्स आनंदी होत आहेत.

हा नऊ सेकंदाचा व्हिडिओ दीपांशु काबरा यांनी 17 फेब्रुवारी रोजी शेअर केला होता. ज्यास आतापर्यंत 28.6K व्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, हा व्हिडिओ 31 जणांनी रीट्वीट केला असून 3,303 लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. यावर युजर्संनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, जर हा पक्षी चोरीच्या आरोपाखाली पकडला गेला तर त्याला किती दिवस शिक्षा होईल. तसेच दुसर्‍या वापरकर्त्याने म्हटलं आहे की, 'हा एक उडणारा चोर आहे.' (वाचा - Fact Check: राजस्थानमधील पिपलेश्वर महादेव मंदिरात दररोज रात्री चित्त्याचा परिवार पुजाऱ्यासोबत झोपतो? जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडिओमागील सत्य)

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक पक्षी छुप्या पद्धतीने एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर तो रेस्टॉरंटमध्ये जातो आणि तेथील चिप्सचे पाकिटे ठेवलेल्या ठिकाणी पोहोचतो. यानंतर, तो आपल्या चोचीमध्ये छुप्या पद्धतीने चिप्सचे पाकिट दाबतो आणि तेथून अत्यंत वेगाने पळून जातो. अत्यंत आरामात चोरी करून, हा पक्षी रेस्टॉरंटमधून पळून जातो आणि लोक त्याकडे पाहतचं राहतात.