Longest Married Couple: लग्नाची 84 वर्षे, 13 मुले आणि 100 हून अधिक नातवंडे! ब्राझिलियन जोडप्याने रचला नवा विक्रम

या जोडप्याने आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. मॅन्युएल अँजेलिम डिनो (वय,105) आणि मारिया डी सौसा डिनो (वय, 101) यांच्या लग्नाला आता 84 वर्षे आणि 77 दिवस झाले आहेत.

Manuel and Maria Dino (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Longest Married Couple: ब्राझिलियन जोडपे (Brazilian Couple) मॅनोएल अँजेलिम डिनो (Manoel Angelim Dino) आणि मारिया डी सौसा डिनो (Maria de Sousa Dino) यांनी सर्वात जास्त काळ टिकून राहिलेल्या वैवाहिक जीवनाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) गाठला आहे. मॅनोएल आणि मारियाचा विवाह 1940 मध्ये झाला होता. या जोडप्याने आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. मॅन्युएल अँजेलिम डिनो (वय,105) आणि मारिया डी सौसा डिनो (वय, 101) यांच्या लग्नाला आता 84 वर्षे आणि 77 दिवस झाले आहेत. लग्न झाल्यानंतर तब्बल 84 वर्षांनंतरही दोघे एकत्र वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत.

त्यांच्या प्रेमाचा प्रवास 1936 मध्ये सुरू झाला होता, जेव्हा ते पहिल्यांदा भेटले होते आणि चार वर्षांनी 1940 मध्ये ब्राझीलमधील सिएरा येथे त्यांनी लग्न केले. तेव्हापासून, त्यांनी एकत्र एक सुंदर जीवन जगलं. त्यांना एकूण 13 मुलं झाली. आता त्यांना एकूण 55 ​​नातवंडे, 54 पणतवंडे आणि 12 पणतू आहेत. (हेही वाचा - Valentine Agreement Between Husband and Wife: पती-पत्नीचा व्हॅलेंटाईन करार सोशल मीडियावर व्हायरल; काय आहे नेमक प्रकरण? वाचा)

व्यक्तींच्या जीवनाचा मागोवा घेणाऱ्या लॉन्गेव्हिक्वेस्ट या गटाने इंस्टाग्रामवर या जोडप्याच्या प्रेरणादायी प्रवासाचे दस्तऐवजीकरण केले. मनोएल पहिल्याच नजरेत मारियाच्या प्रेमात पडले होते, परंतु तिच्या कुटुंबाने सुरुवातीला त्यांचे नाते नाकारले. मनोएलने मारियासोबत राहण्याचा दृढनिश्चय केला होता. कालांतराने मारियाच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला. मारियाचा असा विश्वास आहे की त्यांच्या दीर्घ आणि आनंदी वैवाहिक जीवनाचे एकमेव रहस्य प्रेम आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LongeviQuest (@longeviquest)

सध्या मॅन्युएल आणि मारियाच्या कुटुंबात एकूण 134 सदस्य आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या लग्नाच्या यशाचे रहस्य फक्त प्रेम आहे. मॅनोएल आणि मारिया, दोघेही 100 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. आजही त्यांची एकमेकांवरील प्रेम आणि वचनबद्धता पूर्वीइतकीच मजबूत आहे. मॅन्युएल आणि मारिया यांच्याकडे सर्वात जास्त काळ लग्नाचा विक्रम असला तरी, इतिहासातील सर्वात जास्त काळ लग्नाचा विक्रम कॅनडाच्या डेव्हिड जेकब हिलर आणि सारा डेव्ही हिलर यांच्याकडे आहे. त्यांचे लग्न 1809 मध्ये झाले आणि हे लग्न 88 वर्षे आणि 349 दिवस टिकले. त्यानंतर 1898 मध्ये सारा यांचे निधन झाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement