केरळ मध्ये 60 वर्षीय रोजंदारीवरील मजूर झाला मॉडेल; पहा त्याचे वायरल फोटोज
Mammika प्रमाणेच एक बेघर ब्राझिलियन माणसाचा देखील हेअरकट नंतरचा फोटो असाच वायरल झाला होता. João Coelho Guimarães चा फोटो त्याने हेअर मेकओव्हर केल्यानंतर प्रसिद्ध झाला होता.
सोशल मीडीयामुळे समाजातील अनेक दुर्लक्षित घटकांना आता रातोरात स्टार बनवण्याची किमया सोशल मीडीया घडवू शकतो याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. आज मोबाईल फोन आणि इंटरनेट याच्या मदतीने जगाच्या कानाकोपर्यात पोहचण्याची संधी आपल्याकडे आहे. केरळ मधूनही अशीच एक कहाणी समोर आली आहे.
60 वर्षीय रोजंदारीवर काम करणारा Mammika सध्या सोशल मीडियात चर्चेमध्ये आहे. तो मुळचा Kozhikode आहे. एक मळकट शर्ट आणि लुंगी मध्ये असलेल्या या माणसाचा फोटोग्राफरने असा काही लूक बदलला की सारेच आवाक झाले आहेत.
Mammika ने एक प्रमोशनल फोटो शूट पूर्ण केले आहे त्यामध्ये तो स्टायलिश अंदाजात दिसत आहे.ब्राऊन सूट आणि टाय मधिल मॉडेल लूक असलेल्या Mammika च्या हातात आयपॅड असल्याचा फोटो चर्चेत आहे. या लूकमध्ये येण्यापूर्वी त्याचा मेकओव्हर एका सलोन मध्ये करण्यात आला. नक्की वाचा: स्टेशनवर 'एक प्यार का नग़मा है' गाणाऱ्या रानू दीला मिळाली रिअॅलिटी शो ची ऑफर; मेकओव्हर झाल्यावर ओळखणे मुश्कील (Video).
Mammika प्रमाणेच एक बेघर ब्राझिलियन माणसाचा देखील हेअरकट नंतरचा फोटो असाच वायरल झाला होता. João Coelho Guimarães चा फोटो त्याने हेअर मेकओव्हर केल्यानंतर प्रसिद्ध झाला होता. हा फोटो वायरल होईपर्यंत त्याच्या कुटुंबालाही ठाऊक नव्हते की तो जिवंत आहे. रस्त्यावरचा कचरा उचलून तो विकून आपला दिवस ढकलत होता. पण त्याचा एका उद्योगपती सोबत संबंध आला आणि त्याच आयुष्य पालटलं.
India Today च्या रिपोर्टनुसार, Mammika हा फोटोग्राफर Shareek Vayalil ला रस्त्यावर दिसला. अनेक नेटकरी त्याची तुलना Vinayakan’s doppelgänger सोबत करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)