चेन्नई: 7 वर्षांच्या मुलाच्या तोंडातून डॉक्टरांनी काढले तब्बल 526 लहान-मोठे दात; पहा फोटोज
चेन्नई मधील सविता डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या दुर्मिळ सर्जरीमध्ये डॉक्टरांना एका 7 वर्षांच्या 2 तोंडातून चक्क 526 दात काढले आहेत.
चेन्नई (Chennai) मधील सविता डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (Saveetha Dental College and Hospital) करण्यात आलेल्या दुर्मिळ सर्जरीमध्ये डॉक्टरांनी एका 7 वर्षांच्या मुलाच्या तोंडातून चक्क 526 दात काढले आहेत. 'कम्पाउंड कम्पॉजिट ओनडोन्टओम' (Compound Composite Ondontome) या दुर्मिळ आजाराने हा मुलगा ग्रासला होता. या आजारामुळे त्याच्या उजव्या जबड्याला सूज आली होती. हॉस्पिटलमधील ओरल आणि मॅक्सिलोफेशिअल सर्जरी विभागाचे प्राध्यापक पी.सेंथिलनाथन यांनी सांगितले की, "जबडा सुजल्याचे मुलाच्या पालकांना तो 3 वर्षांचा असताना लक्षात आले. मात्र त्यावेळेस सूज फार नव्हती. त्यामुळे पालकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मुलाला देखील याबद्दल काही विचारले असता त्याने फार काही सांगितले नाही."
मात्र कालांतराने सूज वाढू लागली तेव्हा पालकांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यानंतर करण्यात आलेल्या उजव्या जबड्याच्या एक्स-रे आणि सिटी स्कॅन दरम्यान लहान लहान दात अल्पविकसित दात आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला. सेंथिलनाथन यांनी सांगितले की, "आम्ही ऑपरेशन करुन मुलाच्या तोंडातून लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचे एकूण 526 दात काढले. या संपूर्ण सर्जरीसाठी तब्बल पाच तास लागले." (Fish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं?)
ANI ट्विट:
ओरल आणि मॅक्सिलोफेशियल पॅथलॉजी विभाग प्रमुख आणि प्राध्यापक प्रतिभा रमणी यांनी सांगितले की, "सर्जरीच्या तीन दिवसांनंतर आता तो मुलगा अगदी ठीक आहे." तज्ञांनुसार, कोणत्याही व्यक्तीच्या तोंडातून इतके छोटे छोटे दात काढण्याचा हा जगातील पहिलाच प्रकार आहे.