विहीरीत पडलेल्या Cobra सापाला बाहेर काढण्यासाठी तरूणांनी जीवाची लावली बाजी; चकित करणारा व्हिडिओ सोशल मीडीयात तुफान वायरल (Watch Video)
हा ट्वीट करताना त्यांनी तरूणांचं अभिनंदन देखील केले आहे.
अनेकांना सापाची दहशत वाटते. घरात तो घुसला आहे या कल्पनेनेच अनेकांची झोप उडते पण सध्या सोशल मीडीयामध्ये विहीरीत पडलेल्या सापाला वाचवण्यासाठी 3 तरूणांनी जीवावर उदार होऊन केलेल्या कामगिरीचा व्हिडिओ वायरल होत आहे. काहींना या व्हिडिओमध्ये तरूणांची सापाला वाचवण्याची धडपड प्रशंसनीय वाटत आहे तर काही जण अशाप्रकारे सापाला वाचवण्यासाठी हात दाखवून अवलक्षण असल्याचा प्रकार पाहून संताप व्यक्त करत असतील पण मागील काही दिवस इंटरनेट आणि सोशल मीडीयामध्ये सापाचे विडिओ तुफान वायरल होत असल्याचं पहायला मिळालं आहे. नक्की वाचा: Snake Catcher Nirzara Chitti: साडी परिधान केलेल्या महिला सर्पमित्र निर्जारा चित्ती ने हाताने पकडला कोब्रा; व्हिडिओ पाहून नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव.
दरम्यान सापाला बाहेर काढण्यासाठी धडपड करणार्या तरूणांचा व्हिडिओ IRS officer, Naveed Trumboo यांनी शेअर केला आहे. हा ट्वीट करताना त्यांनी तरूणांचं अभिनंदन देखील केले आहे. या व्हिडिओमध्ये एका तरूणाने सुरूवातीला विहीरीत उडी मारली. त्यानंतर तो पोहत सापाकडे जाण्याचा प्रयत्न करत होता पण साप त्याच्यापासून दूर पळत होता. मग विहिरीतील खाचांमधून दोन तरूण विशिष्ट अंतरावर उभे राहिले सापाचा शेपटीचा भाग पकडून त्यांनी सापाला दोघांच्या मदतीने विहीरीबाहेर काढले. त्यानंतर सापाला शेतामध्ये सोडण्यात आले आहे. OMG! सापाच्या डोक्यावर लावले वापरलेले Condom, श्वास घेण्यास मुश्किल झाल्याने तडफडू लागला साप, वाचा काय घडले पुढे?
पहा सापाचा व्हिडिओ
सध्या सापाचा हा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये तुफान वायरल होत आहे. या व्हिडिओला पोस्ट केल्यापासून आतापर्यंत 269.2kव्हुज मिळाले आहेत. तर लाईक्स 16.2 k आहेत. साप जर त्या तरूणांना चावला असता तर काहीही अघटीत होऊ शकलं असतं पण सुदैवाने सापाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.