2020 Fact Checked! मुकेश अंबानी यांना झाला कॅंन्सर ,लॉकडाऊनमध्ये रशियाने रस्त्यावर सोडले सिंह जाणून घ्या 2020 मध्ये प्रचंड व्हायरल झालेल्या Fake News

2020 निरोप देताना पाहूयात अशा काही न्यूज ज्या खोट्या असूनही खुप व्हायरल झाल्या.

Photo Credit : File Image

2020 साल संपण्यासाठी अवघे काही दिवस आता शिल्लक राहिले आहेत.तुम्ही सगळेच जण हे वर्ष संपल्याची वाट पाहत असाल कारण 2020 या वर्षाने देशभरात कोरोना सारख्या महामारीचे साम्राज्य पसरवले.त्यामुळे येणारे वर्ष हे नक्की या पेक्षा चांगलेच असेल या आशेवर आपण सगळेच जण सध्या आहोत. सध्या च्या जगात सोशल मिडियाचा वापर हा  कित्येक पटींनी वाढला आहे त्यामुळे चांगल्या वाईट बातम्य सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही सेकंदात लाखो लोकांपर्यंत पोहचतात पण त्यामुळे ज्या बातम्य खऱ्या नाहीत अशा ही बातम्य पसरल्या जातात. 2020 निरोप देताना पाहूयात अशा काही न्यूज ज्या खोट्या असूनही खुप व्हायरल झाल्या. (Shocking: कुत्र्यावरुन मुलगा-वडिलांमध्ये तुफान राडा, दोघांनी एकमेकांवर झाडल्या गोळ्या )

लॉकडाऊनमध्ये रशियाने रस्त्यावर सोडले सिंह

अशीच एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सध्या जगातील बर्‍याच देशांमध्ये कोरोनावर लॉकडाउन आहे. या प्रकरणात रशियाची एक बातमी व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की लॉकडाऊनमध्ये रशियाने रस्त्यावर सिंह सोडले आहेत. जेणेकरून लोक घरातच राहतील आणि लॉकडाउन तोडण्याची हिम्मत करू शकणार नाही.हा व्हायरल दावा खोटा ठरला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चित्रित केलेला हा सीन होता. ज्याचे फोटो असे चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाले.

इटलीचे पंतप्रधान मिडियीसमोर रडले 

इटलीच्या पंतप्रधानांच्या नावाने एक फोटो व्हायरल झाला होता . देशामध्ये को रोनाने घातलेलं थैमान पाहून इटलीच्या पंतप्रधानांना अश्रू अनावर झाले, असा मजकूर या फोटोबरोबर व्हायरल करण्यात येत होता . मात्र या फोटोबद्दलची वेगळीच माहिती नंतर समोर आली आहे.अनेक नेटकऱ्यांनी रडणाऱ्या व्यक्तीचा फोटो हा इटलीच्या पंतप्रधानांनी आम्ही सर्व आशाच सोडून दिल्या आहेत असं सांगितलं आणि त्यांना अश्रू अनावर झाले, अशा स्वरुपाची ‘द डेली बिहार’ नावाच्या वेबसाईटची बातमी शेअर केली. कोवीड-१९ मुळे देशात झालेल्या मृत्यूंबद्दल बोलताना इटलीचे पंतप्रधान रडले अशी बातमी या वेबसाईटने केली होती त्यासाठी रडणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो वापरण्यात आला होता.

कतारची राजकन्या सात पुरुषांसह युकेच्या हॉटेलमध्ये पकडली गेली

एका वर्तमानपत्राचे कटिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते . लेखाच्या शीर्षकानुसार कतारची राजकन्या शेखा साल्वा ही ब्रिटनच्या एका हॉटेलमध्ये सात पुरुषांसह जणांसह पकडली गेल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र याचा शोध घेतला असता वेगळीच माहिती समोर आली. या दरम्यान आबू धाबी स्कूल ऑफ़ मैनेजमेंट ची एक लिंक मिळाली. जय लिंक मध्ये यूएईची महिला व्यवसायी आलिया अब्दुल्ला अल-मज़रुई हिची प्रोफ़ाइल मिळाली. या प्रोफाइलमधील फोटो कतरच्या राजकन्या शेखा साल्वा यांच्या कथित फोटोशी जुळते.

मुकेश अंबानी यांना झाला Pancreatic Cancer

भारतातील श्रीमंताच्या यादीत असलेले मुकेश अंबानी यांच्या बाबतीत एक बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. ज्यात असे सांगितले गेले होते आहे की रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानीयांना अग्नाशय कॅन्सर (Pancreatic cancer) झाला आहे. या बातमी मागचे सत्य पडताळून पाहिले तेव्हा मुकेश अंबानी यांना कुठलाही कॅन्सर झाला नसल्याचे समोर आले आहे. ही एक खोटी बातमी आहे. लेटेस्टली याबाबतची रिलायन्स जिओच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन टीमसोबत बातचीत करुन ही बातमी खोटी असल्याचे सांगितले.

बडवायजर कंपनीचा कर्मचारी तब्बल 12 वर्षे बिअर टँकमध्येच करायचा लघवी

प्रसिद्ध बडवायजर कंपनी मधील कर्मचारी तब्बल 12 वर्षे बिअर टँकमध्येच करायचा लघवी, अशी बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती.या बातमीनंतर मद्य अनेक मद्यप्रेमींनी संताप व्यक्त करत कंपनीकडेही तक्रार केली. एका वेबसाईटने बडवायजर कंपनीतील कर्मचारी गेली 12 वर्ष बिअरच्या टँकमध्ये मूत्रविसर्जन करत होता, अशी हेडलाईन देऊन बातमी केली होती. यात कर्मचाऱ्याचं बदललेलं नावही देण्यात आलं होतं. या कर्मचार्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले होते. या कंपनीतील 750 कर्मचारी हे कृत्य करत असल्याचे या बातमीत म्हटले होते. मात्र, ही बातमी खोटी असून हा केवळ एक मनोरंजनाचा भाग होता असे समोर आले.



संबंधित बातम्या