Zika Virus in Maharashtra: चिंता वाढली! पुण्यातील तब्बल 79 गावांना झिका विषाणूचा धोका; सरकारकडून अलर्ट जारी
यामध्ये कोरोना विषाणूच्या स्वरूपामध्ये सतत होणारा बदल हे चिंतेचे कारण आहे. आता महाराष्ट्रातील पुण्यात (Pune) झिका विषाणूची (Zika Virus) पुष्टी झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. भयावह गोष्ट म्हणजे यामुळे एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 79 गावे झिका विषाणूच्या धोक्याच्या सावटात आहेत
सध्या देश आणि मुख्यत्वे महाराष्ट्र कोरोना विषाणूच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेच्या तोंडावर उभे आहेत. यामध्ये कोरोना विषाणूच्या स्वरूपामध्ये सतत होणारा बदल हे चिंतेचे कारण आहे. आता महाराष्ट्रातील पुण्यात (Pune) झिका विषाणूची (Zika Virus) पुष्टी झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. भयावह गोष्ट म्हणजे यामुळे एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 79 गावे झिका विषाणूच्या धोक्याच्या सावटात आहेत. या सर्व गावांमध्ये आता अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळनंतर महाराष्ट्रातील पुण्यात झिका विषाणू पोहोचला. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील 50 वर्षीय महिलेला झिका विषाणूची लागण झाली आहे. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.
मात्र यानंतर महाराष्ट्र राज्यापासून केंद्रापर्यंत खळबळ उडाली. केंद्रीय संघ पुण्यात पोहोचला होता व त्यांनी एनआयव्ही, पुण्याच्या शास्त्रज्ञांसोबत बैठकही घेतली. जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील 79 गावे झिका विषाणूच्या धोक्यात आहेत व येथे अलर्ट जारी करण्यात आला आहे. उपयोजना म्हणून सर्व आपत्कालीन सेवा अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या आहेत. डीएमने ने या 79 गावांच्या नावांची यादीही जाहीर केली आहे.
डीएम म्हणाले की, जिल्ह्यातील 79 अशी गावे जिथे डेंग्यू, चिकनगुनिया सारखे रुग्ण गेल्या तीन वर्षांपासून वाढत आहेत, ती अत्यंत संवेदनशील यादीत ठेवण्यात आली आहेत. या गावांतील लोक, अधिकारी आणि आपत्कालीन सेवांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. या विषाणूची पुष्टी झाल्यानंतर राज्यात चर्चा व बैठका सुरु आहेत. यामध्ये केंद्रीय पथकही मदत करत आहे. गावांतील 18 लोकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या लोकांमध्ये तापासह डेंग्यू, चिकनगुनियाची लक्षणे दिसत होती. या लोकांचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे. (हेही वाचा: Schools Reopening In Pune: पुण्यात 16 ऑगस्ट पासून शाळा, कॉलेज सुरू करण्याच्या तयारीला सुरूवात)
झिका विषाणू संक्रमित एडीस प्रजातीच्या डासांच्या चाव्याने पसरतो. हे संक्रमित डास दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला संक्रमित करू शकतात. एडीस अल्बोपिक्टसमुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप यासारखे आजारही होतात. कोविडच्या तुलनेत झिका विषाणूची लक्षणे सौम्य असतात किंवा जास्त गंभीर नसतात.