Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: किरकोळ वादातून तरुणाची चाकून भोसकून हत्या, छत्रपती संभाजी नगर येथील घटना

छत्रपती संभाजीनगर येथेल एका तरुणाची किरकोळ वादातून चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे.

Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Murder Case: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील एका तरुणाची किरकोळ वादातून चाकूने भोकसून हत्या (Murder) करण्यात आली आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहारातील हॉटेल पटेल येथे ही घटना घडली. शुक्रवारी सांयकाळी तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. शाहजेब शकील खान असा हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर इकरार उर्फ छोटू मतीन खान याने शाहजेब शकिलची हत्या केली आहे. (हेही वाचा- राहत्या घरात आढळला वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह, हत्येचा संशय,)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहजेब आणि इकरार यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ गोष्टींवरून भांडण सुरु होते. पूर्व वैमनास्यातून इकरारने शाहजेबची हत्या केली. दोघांमध्ये भांडण मारामारी देखील झाली होती. दोघांच भांडण मिटवण्यासाठी इकरार याचा मोठा भाऊ अबरार याने या वादात मद्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी त्यांनी हॉटेल पटेल मध्ये भेटण्यासाठी बोलवले. त्याचा मित्र फैजल सोबत होता.

सुरुवातीला त्यांच्या शांतपणे बोलणं सुरु होते. पुन्हा  एका विषयावरून इकरार आणि शाहजेब यांच्यात बाचाबाची झाली. अबरार आणि फैजल यांनी इकारारला शांत करण्याचा प्रयत्न करूनही परिस्थिती बिघडत चालली होती. रागाच्या भरात इकरारने खिशातून चाकू काढून शाहजेहच्या खांद्यावर आणि पाठीवर वार केला. या हल्ल्यात शाहजेब गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत शाहजेबला रुग्णालयात दाखल केले. परंतु रक्तस्राव जास्त झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळीवरून आरोपी फरार झाला. घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहे.