Pune Shocker: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वयंपाकाच्या वादातून तरुणाची लोखंडी रॉडने हत्या; पहा धक्कादायक व्हिडिओ

ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Youth killed with iron rod over cooking dispute (फोटो सौजन्य - X/@SameerK42409017)

Pune Shocker: पिंपरी-चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad) अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वयंपाक करण्याच्या वादातून एका तरुणाने आपल्या 19 वर्षीय सहकाऱ्याची लोखंडी रॉडने वार (Iron Rod) करून हत्या (Murder) केली आहे. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दीपू कुमार असं मृत तरुणाचे नाव आहे.

मुकेश कुशवाहने असं आरोपीचं नाव आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती लोखंडी रोडने त्याच्या सहकर्मचाऱ्यांजवळ झोपलेल्या दुसऱ्या तरुणाच्या डोक्यावर वार करताना दिसत आहे. (हेही वाचा -Boy Dead After Drowning In Water Tank At Vashi: वाशी येथील उद्यानातील पाण्याच्या टाकीत बुडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू)

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वयंपाकाच्या वादातून तरुणाची लोखंडी रॉडने हत्या, पहा व्हिडिओ - 

प्राप्त माहितीनुसार, हा गुन्हा शुक्रवारी घडला, जेव्हा घटनेपूर्वी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर एका खाजगी उत्पादन युनिटमध्ये काम करणारे कामगार झोपायला गेले होते. कुशवाह मात्र जागाच राहिला. त्यानंतर त्याने कुमारवर लोखंडी रोडने हल्ला केला. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.