Dombivli News : 'परीक्षा सुरू आहे, स्पीकरचा आवाज कमी करा' सांगितलं, तरूणांनी त्याला धू धू धुतलं, डोंबिवलीतील घटना

महत्त्वाचं म्हणजे या काळात मुलांच्या परिक्षा सुरू आहेत. तरी अशी घटना घडत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Crime | (File image)

Dombivli News : राज्यासह देशभरात सध्या सर्वत्र परीक्षांचा काळ सुरू आहे. शाळकरी विद्यार्थी, कॉलेज स्टुडंट्स यासह बोर्डाचे विद्यार्थी अशावेळी वर्षभराच्या अभ्यासाची उजळणी ( exam period ) करत आहेत. त्यामुळे त्यांना शांततेची गरज आहे. अभ्यास करून पेपर द्यायचा प्रत्येक विद्यार्थ्याचा मानस आहे. मात्र, डोंबिवलीतून (Dombivli) धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारच्या घरात वाढदिवसाची पार्टी सुरू होती. त्यामुळे स्पीकरचा आवाज जास्त होता. परिणामी एका विद्यार्थ्याला अभ्यासात अडचणी येत होती. स्पीकरचा आवाज कमी करावा असे सांगण्यासाठी त्यांच्या घरातील एक जण शेजाऱ्यांकडे गेला. मात्र, शेजाऱ्यांना हे सांगताच त्यांचा राग अनावर होतं. त्यांनी त्या तरूणाला मारहाण (youth beaten up) केली. (हेही वाचा : Latur Crime: लातूरमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद, दोघा भावांवर जीवघेणा हल्ला, एकाचा दुदैवी मृत्यू, 1 जखमी) 

आजूबाजूचे गोंधळ, आवाज यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही. असाच त्रास डोंबिवली पूर्वेतील विद्यार्थ्यांला झाला. मध्यरात्र उलटून गेली तरी स्पीकरवरील गाण्यांचा आवाज कमी होत नव्हता. ते कमी होते म्हणून त्याला असा मनस्तापही सहन करावा लागला. सुसंस्कृतांचे शहर म्हणून डोंबिवली शहराची ओळख आहे. मात्र, डोंबिवलीत अशी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. डोंबिवलीमधील रामनगर पोलीस ठाणे हद्दीतीत शेतार चौक येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. रात्रीचे बारा वाजून गेले तरी त्यांच्या घरी मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर गाणी लावण्यात आली होती. पण यामुळे इतर नागरिकांना त्रास होत होता. म्हणूनच एका रहिवाशाने त्यांना आवाज कमी करण्यास सांगितले. सकाळी कामावर जायाचे आहे, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. लाऊडस्पीकरचा आवाज कमी करा, असे त्याने सांगितले. पण याच सांगण्याचा राग आल्याने दोन तरूणांनी त्या इसमाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडती. (हेही वाचा : Nashik Crime: परप्रांतीय महिलेचा नाशिकमध्ये खून, एक जण गंभीर जखमी,गुन्हा दाखल)

श्याम दीपक सोनावणे असे मारहाण झालेल्या रहिवाशाचे नाव आहे. ते या मारहाणीत जखमी झाले. त्यांनी या घटनेची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. शनिवारी इंदिरानगरमध्ये रामदास अहिरे यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. रात्रीचे साडेबारा वाजून गेले तरी लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजातील गाणी सुरूच होती. अहिरे यांच्या शेजारी राहणारे, श्याम सोनावणे आणि इतर शेजाऱ्यांनी अहिरे यांना गाण्यांचा, लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली. पण अहिरे कुटुंबियांना त्ंयाचा राग आला. त्याशिवाय, वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजर असलेल्या दोन तरूणांना श्याम यांचे बोलणे सहन न झाल्याने त्यांनी श्याम यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली.