'छत्रपतींच्या वंशजांबद्दल काहीही वेडेवाकडे बोलले तर, जीभ कापून टाकू' नारायण राणे यांचा संजय राऊत यांना इशारा
यातच भाजप नेते नारायण नाणे (Narayan Rane) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन राजकारण भडकले असून अनेक राजकीय नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच भाजप नेते नारायण नाणे (Narayan Rane) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. यापुढे संजय राऊत छत्रपतींच्या वंशजांबद्दल काहीही वेडेवाकडे बोलले, तर त्यांची जीभ जागेवर राहणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून संजय राऊतांना सत्तेचा माज चढला आहे, असे विधानही नारायण राणे यांनी त्यावेळी केले.
संजय राऊत यांनी काल पुण्याच्या एका कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, असे विधान केले होते. त्यावरून राज्यात राजकारण तापले असून नारायण राणे यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.दरम्यान, नारायण राणे म्हणाले की “संजय राऊत यांना सत्तेचा माज चढला आहे. त्यामुळे त्यांची जीभ खूप चालत आहे. आता यापुढे ते छत्रपतींच्या वंशजांबद्दल काहीही वेडेवाकडे बोलले तर, त्यांची जीभ जागेवर राहणार नाही. संजय राऊतांच्या भावाला मंत्रिपद मिळालेनाही. तेव्हापासून राऊत अशी वक्तव्य करत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.”असेही नारायण राणे म्हणाले आहे. हे देखील वाचा- 'करीम लाला' या नावाच्या उच्चाराने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारा हा व्यक्ती नेमका आहे कोण? जाणून घ्या त्याची गुन्हेगारी जगतातील पार्श्वभूमी
नुकतेच संजय राऊत यांनी भारताचे कॉंग्रेस दिवंगत नेत्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बाबतीत एक वक्तव्य केले होते. इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांची भेट घ्यायच्या, असे संजय राऊत म्हणाले होते. यावरूनही नारायण नाणे यांनी संजय राऊत यांच्यावर टोला लगावला आहे. संजय राऊत जे बोलले त्याची नैतिक जबाबदारी उद्धव ठाकरे यांची आहे, असेही नारायण राणे म्हणाले आहेत.