Yes Bank Crisis: येस बँक, म्यूचुअल फंड, गुंतवणूकदार आणि संभ्रमीत ग्राहक यांबाबत अभ्यासकांचा दृष्टीकोन काय?
गेले प्रदीर्घ काळ बँक आज ना उद्या अडचणीत येणार अशी चर्चा होती. ही चर्चा आज प्रत्यक्षात आलेली दिसते आहे. दरम्यान, असे असले तरी या बँकेत म्यूचुअल फंडाच्या रुपात गुंतवलेली रक्कम काढून घेण्याची आवश्यकता नाही.
Yes Bank Crisis: येस बँक प्रकरणामुळे आर्थिक वर्तुळात अनेकांचे धाबे दणानले आहेत. खास करुन यात सर्वसामान्य ग्राहक (Yes Bank Consumer) आणि गुंतवणूकदार (Yes Bank Investor) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यातही अधिक तपशिलात जायचे तर, म्यूचुअल फंड (Yes Bank Mutual Fund) गुंतवणूकदार अधिक घाबरले आहेत. येस बँक प्रकरणामुळे याचा आर्थिक आणि खास करुन आपल्या गुंतवणुकीवर नेमका काय परिणाम होईल? येस बँकेचे खरेदी केलेले म्यूचुअल फंडातील रक्कम काढून घ्यावी काय? यांसह इतरही अनेक प्रश्नांचा विचार केला जात आहे. इथे लेटेस्टली मराठी येस बँक आणि इतर कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीबद्दल सल्ला देत नाही. वाचकांनी आपल्या जबाबदारीवर गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहारांबाबत सल्ला घ्यावा. परंतू, सध्या येस बँक, म्यूचुअल फंड , गुंतवणूकदार आणि संभ्रमीत ग्राहक यांबाबत अभ्यासकांचा दृष्टीकोन काय याबाबत मात्र इथे माहिती जरुर दिली आहे. ही माहिती केवळ ज्ञानात भर या उद्देशाने दिली आहे. त्याला गुंतवणूक सल्ला समजू नये.
येस बँक प्रकरणानंतर गुंतवणुकदारांकडून विचारले जाणारे प्रमुख प्रश्न
- संकटात असलेल्या एस बँकेमुळे आमच्या गुंतवणूक योजनांना हानी पोहोचली आहे. आम्ही काय करावे?
- आम्ही येस बँकेत गुंतवलेला पैसा काढून सुरक्षीत फंडांमध्ये गुंतवावा?
- येस बँकेत गुंतवलेला आमचा पैसा कायम ठेवला तर त्याचा योग्य तो परतावा आम्हाला मिळेल?
वरील प्रश्नांवर अभ्यासक काय म्हणतात?
- येस बँक अडचणीत असल्याची पहिल्यापासूनच आर्थिक आणि औद्योगिक विश्वाला कल्पना होती. गेले प्रदीर्घ काळ बँक आज ना उद्या अडचणीत येणार अशी चर्चा होती. ही चर्चा आज प्रत्यक्षात आलेली दिसते आहे. दरम्यान, असे असले तरी या बँकेत म्यूचुअल फंडाच्या रुपात गुंतवलेली रक्कम काढून घेण्याची आवश्यकता नाही.
- येस बँक प्रकरणामुळे निर्माण झालेल्या संकटाचा परिणाम या आधीच तुमच्या पोर्टफोलियोवर झाला आहे. त्यामुळे आता त्यातील पैसे काढायचे तर पुन्हा टॅक्सही लागणार आणि शेअर्सना योग्य भावही मिळणार नाही. अगर आपल्या योजनेनुसार येस बँकेत 1-4 टक्के गुंतवणूक आहे तर घाबरुन जाऊ नका. दरम्यान, जर आपली गुंतवणूक जर त्याहीपेक्षा अधिक असेल तरीही आपण विशेष काही करु शकत नाही. त्यामुळे सध्यास्थितीत तरी ही गुंतवणूक कायम ठेवा.
- काही म्यूचुअल फंड संस्थांनी येस बँकेच्या संकटापासून स्वत:ला वेगळे केले आहे. यात आरबीआय, सेबी यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. संकटता असलेल्या बँकेत इतर संस्थांनी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांचे नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, हे नक्की कधी घडू शकेल मात्र अनिश्चितता आहे.
- जर जे नुकसान व्हायचे ते आगोदरच होऊन गेले आहे तर, आता सुरक्षेसाठी गुंतवणुकीतून माघार घेणे हितावह नाही. जर आपली योजना (स्किम) चांगली आहे आणि येस बँकेशिवाय पोर्टफोलियोमध्ये इतर शेअर्स चांगली कामगिरी करत असतील तर गुंतवणुकीवर टीकून राहा. ज्यामुळे आपल्याला भविष्यात चांगाला फायदा होऊ शकतो. (हेही वाचा, येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची मुलगी रोशनी हिला मुंबई विमानतळावर अडवले)
- काही अशाही योजना आणि गुंतवणूकदार आहेत ज्यांची येस बँकेत अधिक गुंतवणूक आहे. डेट पोर्टफोलियोमध्ये अशा प्रकारच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी (कॉन्सेंट्रेशन) फंड मॅनेजरला जाब विचारायला हवा. मात्र, येस बँक प्रकरण हे गुंतवणूकदारांसाठी एक धडाही आहे. हा धडा असा आहे की, जर आपल्याला आर्थिक गुंतवणुकीतील काही गोष्टी ध्यानात येत नाहीत तर, त्यासाठी एखाद्या प्लानरची मदत घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी स्वत: अभ्यास करणे केव्हाही चांगले. पण, अनेकदा असा अभ्यास करणे अनेकांना शक्य नसते. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे. गुंतवणूक मार्गदर्शकाचा सल्ला घेणे तसेच, आपला गुंतवणूक मार्गदर्शक योग्य सल्ला देतो आहे की नाही, हेसुद्धा वेगळ्या मार्गदर्शकाकडून तपासून घेणे महत्त्वाचे असते.