यवतमाळ येथे वाघिणीचा गायीवर हल्ला, वन विभागाने उपाययोजना करण्याची गावकऱ्यांकडून मागणी
तर गायीवर हल्ला फक्त वाघिणीच नाही तर तिच्या बछड्यांनी सुद्धा हल्ला केला आहे. या हल्लाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
यवतमाळ येथे एका वाघिणीकडून गायीवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तर गायीवर हल्ला फक्त वाघिणीच नाही तर तिच्या बछड्यांनी सुद्धा हल्ला केला आहे. या हल्लाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. परंतु गावकऱ्यांमध्ये वाघिणीच्या वावरामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वन विभागाने या प्रकरणी उपाययोजना करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार गावातील एका शेताच्या नजीक घडला असून तेथील गोठ्याजवळच घडला आहे.टिपेश्वर अभयारण्याजवळ सुन्ना येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एका वाघिणीने तिच्या बछड्यासह एका गायीवर हल्ला केला.
शेताजवळील एका गोठ्याजवळ काही गायी बसल्या होत्या तिथेच वाघिणीकडून हल्ला करण्यात आला आहे.या घटनेचे फोटो स्थानिकांकडून काढण्यात आले आहेत. पण वाघिणीच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच चंद्रपूर येथे नरभक्षक अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र आता 'अवनीं नंतर एका वाघाच्या हल्ल्यात महिला मृत्यूमुखी पडल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली होती. 55 वर्षीय सखुबाई कस्तुरे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.(भंडारा: वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणाने घेतले मेल्याचे सोंग; पहा व्हायरल व्हिडिओ)
यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात वाघाने स्थानिक शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. रात्री पीक राखणीसाठी शेतकरी गेला असता वाघाने पाठून येत त्यांच्यावर हल्ला केला. तर चंद्रपूर, यवतमाळ येथे वाघांची दहशत खूप वाढली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले होते. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास 15 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितले होते.