Yavatmal Accident: यवतमाळमध्ये भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक; पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी महामार्ग चौकीत ही घटना घडली आहे.
यवतमाळ (Yavatmal) येथे कर्तव्य बजावत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती (Accident News) मृत्यू झाला आहे. एका ट्रक चालकाने पोलीस जिपला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी महामार्ग चौकीत ही घटना घडली आहे. पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना रात्रीच्या वेळी नांदेडहून यवतमाळकडे ट्रक जात होता. यावेळी समोर असलेल्या ट्रकने पोलीस जिपला जोरात धडक दिली. ट्रक इतका भरधाव वेगात होता पोलीस जिपचा यात चक्काचूर झाला आहे. (हेही वाचा - ST Bus Accident: पसरणी घाटात बसचा अचानक ब्रेक फेल झाला, अपघातात एका महिलेचा मृत्यू)
या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण जखमी झालेत. संजय नेटके,असे मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताची मालिका ही सुरु झाली आहे ती काही थांबण्याचे नावच घेत नाही आहे. काल बुलढाण्यातील मलकापूरमध्ये दोन खासगी बस या एकमेकांसमोर धडकल्याची घटना ही घडली होती. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले होते. तर आज पुण्यातून महाबळेश्वरला जात असताना आणखी एका बसचा अपघात घडून आला. या अपघातात 20 ते 25 प्रवाशी बस मध्ये होते. दरम्यान दुचाकी वर बसलेल्यापैकी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर आली आहे.