Yavatmal Crime: पार्कींगच्या वादातून एकाची निर्घृण हत्या, दाम्पत्यांना अटक, यवतमाळ येथील घटना

यवतमाळ येथील कंबळ भागातील एका दाम्पत्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Yavatmal Crime: यवतमाळ येथील कबंळ भागातील एका दाम्पत्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. निजमोद्दीन उर्फ देवा निजामोद्दीन देशमुख असे या मृत युवकाचे नाव आहे. निजामोद्दीन याच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी पतीसह पत्नीला देखील अटक केले आहे. किरकोळ वादातून नियामोद्दीनची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा- कर्नाटकात हॉटेलरूम मध्ये घुसून जोडप्याला मारहाण)

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी निजमोद्दीन ई रिक्षाने कळंब येथे बिस्किट विक्रीचा व्यवसाय करीत होता. मंगळवारी आठवडी बाजारात त्याने गल्लीत ई रिक्षा थांबवली. दरम्यान दाम्पत्य नंदकिशोर थोरात आणि त्याची पत्नी माया थोरात व्हॅन घेऊन पोहोचले.ई रिक्षा असल्यामुळे त्यांना जाता येईना, तर निजामोद्दीनला रिक्षा काढण्यास सांगितली. निजमोद्दीनने त्यांना बस्स एक मिनीट असं उत्तर देत सामान रिक्षात भरत होता. त्यांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि पीडितेला शिवीगाळ केली.

त्यानंतर वाद सुरु करत त्यांनी लोंखडी रॉड काढला आणि निजमोद्दीन वर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. जमावानी देखील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. दाम्पत्य व्हॅन घेऊन घटनास्थळावरून फरार झाले. त्यांंच्या पाठलाग देखील निजमोद्दीने केला परुंतु ते थेट पळून गेले. त्यानंतर तो उपचारा साठी दवाखान्यात गेला. दवाखान्यात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मृत व्यक्तीचा भावाने पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.