IPL Auction 2025 Live

Workers to Get Household Items: कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना मिळणार गृहपयोगी वस्तू संच; थाळ्या, वाटया, ग्लास, प्रेशर कुकर आदींचा समावेश, जाणून घ्या प्रक्रिया व कुठे कराल नोंदणी

कोल्हापूर जिल्हा राज्यात नोंदीत कामगरांच्या कामात अग्रेसर असून 3 लाखा हून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे.

Workers to Get Household Items

Workers to Get Household Items: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कामगार विभागामार्फत 1.15 लाख कामगारांना मागणीनूसार गृहपयोगी वस्तू संच वाटप होणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ मंत्री वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, येत्या काळात विविध मंडळे स्थापन करून महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या साडेचार कोटी कामगारांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.

साडे चार कोटींपैकी काहीच नोंदीत कामगार आहेत. उर्वरीत शेत कामगार, कापड उद्योग कामगार, हॉटेल व्यवसायातील कामगार, ट्रक चालक, रिक्षा चालक तसेच इतर मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्यांसाठी मंडळे स्थापन करून त्यांचेही जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करता येईल. या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात 10 नोंदीत कामगारांना कामगार विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे लाभ वितरीत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना शासकीय योजनांचे चांगल्या प्रकारे लाभ घेण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले, कामगार विभागात कामगार मुलांच्या शिक्षणासाठी, पत्नी किंवा तीच्या गरोदरपणात अर्थिक मदत, आरोग्यासाठी 5 लाखांचा विमा, मृत्यू पश्चात अर्थिक मदत अशा अनेक योजनांमधून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मदत देत आहे. कामगारांच्या जीवनात आनंद देण्याचे कार्य शासन करीत असून येत्या काळात विविध मंडळे स्थापन करून उर्वरीत कामगारांनासुद्धा या योजनांमधे आणण्यासाठी प्रयत्न होतील.

आज शुभारंभ केलेल्या गृहपयोगी संचामधे किचनमधे आवश्यक साहित्य यात थाळ्या, वाटया, ग्लास, प्रेशर कुकर, पाण्याचा पिंप आदी साहित्याचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्हा राज्यात नोंदीत कामगरांच्या कामात अग्रेसर असून 3 लाखा हून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यातील 1.15 लक्ष जीवीत नोंद कामगार आहेत. आता गृहपयोगी वस्तू संच वाटपाला जिल्हयात सुरूवात होत आहे. सर्वांना त्याचे वाटप होणार असून पुढिल दोन वर्षे ही योजना सुरू राहणार आहे. त्यामुळे कामगारांनी घाई न करता या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. (हेही वाचा: Global Luxury Real Estate Markets: जगात सर्वात महागड्या घरांच्या शहरांच्या यादीत मुंबई 8 व्या क्रमांवर; लक्झरी हाऊसिंग मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ- Reports)

असे मिळावा गृहपयोगी संच-

कोल्हापूर जिल्हयात 1.15 लाख नोंदीत कामगार यासाठी पात्र आहेत. ही योजना दोन वर्षे सुरू राहणार असून एका कुटुंबातील एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे संच मिळविण्यासाठी घाई न करता, कामगारांनी 9307059989 या मोबाईल क्रमांकावर संच मिळण्यासाठी नोंदणी करावी. किंवा प्रत्यक्ष येवून मुस्कान लॉन, कोल्हापूर येथे टोकन घ्यावे. नोंदणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संच वाटप होईल. या प्रक्रियेत त्याचे बायोमेट्रीकही तपासले जाणार आहे. दर दिवशी 500 संच वितरीत केले जाणार आहेत. त्यामुळे कामगार विभागाने गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.