Coronavirus: जालना जिल्ह्यात प्रत्येक पंधरा दिवसानंतर केली जाणार कामगारांची कोरोनाची तपासणी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
त्यानुसार आता जिल्ह्यातील काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराची प्रत्येक 15 दिवसाने कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.
महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता जिल्ह्यातील काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराची प्रत्येक 15 दिवसाने कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. हे आदेश सर्वांसाठी अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील व्यापारी संगठनांसोबत बैठक घेतली. त्यावेळी कोरोनाच्या परिस्थिती बद्दल त्यांच्यासोबत चर्चा करुन या नव्या आदेशाचे पालन करण्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीला व्यापाऱ्यांसह पोलीस अधीक्षक विनायक देशमुखसह अन्य जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जालनामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय असल्याने हजारोंच्या संख्येने कामगार येथे काम करतात. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कामगारांची प्रत्येक 15 दिवसांनी कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. तर 1 एप्रिल पासून 45 वर्षावरील सर्व कामगारांसाठी प्रशासनाकडून मोफत कोरोनाची लस दिली जाणार आहे. कोरोनाची चाचणी आणि कोरोना लसीसाठी प्रशासनाकडून काही टीम्स सुद्धा तयार करण्यात आल्या आहेत. ज्या 1 एप्रिल पासून काम करण्यास एकत्रित येणार आहेत.(Coronavirus in Nagpur: नागपूर जिल्ह्यात आज 3,630 नवे कोविड-19 रुग्ण; 60 मृत्यू)
महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लस दिली जाणार आहे. खासगी दावाखान्यात एका लसीसाठी अडीचशे रुपये तर शासकीय रुग्णालयात मोफत लस दिली जात आहे. परंतु खासगी रुग्णालयात लसीसाठी पैसे द्यावे लागत असल्याने नागरिक ती घेत नाही आहेत.