लॉक डाऊन काळात ऑनलाइन Food Order करणे पडले महागात; महिलेला 50 हजाराचा गंडा

मुंबईतील (Mumbai) एका महिलेने सोशल मीडियावर पाहिलेल्या जाहिरातीतून फूड ऑर्डर करण्यासाठी लॉग इन करून अकाउंट डिटेल्स टाकताच तिच्या खात्यातून तब्बल 50 हजार रुपये काढले गेल्याचे समजत आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown) दरम्यान काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) करण्यास हॉटेल्सना परवानगी देण्यात आली आहे. मात्र ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करताना नागरिकांनी दक्षता बागळण्याची गरज आहे, अन्यथा किरकोळ शे- दोनशे रुपयांची ऑर्डर सुद्धा तुम्हाला हजारो रुपयांचा गंडा घालू शकते. असाच काहीसा प्रकार मुंबईतील (Mumbai) एका महिलेच्या बाबत घडला आहे. प्राप्त माहितीनुसार संबंधित महिलेने सोशल मीडियावर पाहिलेल्या जाहिरातीतून फूड ऑर्डर करण्यासाठी लॉग इन करून अकाउंट डिटेल्स टाकताच तिच्या खात्यातून तब्बल 50 हजार रुपये काढले गेल्याचे समजत आहे. या महिलेने याबाबत एलटी मार्ग पोलीस ठाण्यात पोलिसात तक्रार नोंदवली असून गुन्हे अन्वेषण विभागाची टीमही याप्रकरणाची चौकशी करत आहे. व्हॉट्सऍपवर चुकीच्या माहितीचा प्रसार करणे आता पडेल महागात; महाराष्ट्र सायबर सेलकडून सोशल मीडियासाठी विशेष मार्गदर्शिक जारी

पोलिसांकडे नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार, या 49 वर्षीय महिलेने सोशल मीडियाववर एका हॉटेलची जाहिरात पाहिली होती. त्यानंतर तिने या पोस्टरवरील नंबरवर फोन लावून जेवणाची ऑर्डर घेण्यास सांगितले. मात्र हॉटेलच्या कर्मचाऱ्याने एक लिंक पाठवतो त्यावर नाव, पत्त्यासह डिटेल्स भरा जेणेकरून तुम्हाला पुढच्यावेळी पुन्हा रजिस्टर करण्याची गरज लागणार नाही असे सांगितले. त्यानुसार, या महिलेने लिंक ओपन करून त्यात आपल्या डेबिट कार्डच्या माहिती सह डिटेल्स भरले. काही वेळाने हॉटेलमधून पुन्हा फोन आला आणि चार अंकी कान्फरमेशन ओटीपी विचारण्यात आला.

दरम्यान, या महिलेने जेवणाची ऑर्डर द्यायला सुरुवात करताच तिच्या फोनवर पाठोपाठ काही मॅसेज आले आणि याबाबत तपासणी करताच तिच्या खात्यातून 49 हजार 954 रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले. तितक्यात फोन सुद्धा कट करण्यात आला. आपली फसवणूक आल्याचे कळताच आता महिलेने पोलिसात तक्रार नोंदवली असून याबाबत पुढील तपास सुरु आहे.