Mumbai: दिल्ली-मुंबई फ्लाइटमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; प्राध्यापकाला अटक
विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर ते सहार पोलिस ठाण्यात गेले आणि महिलेने यासंदर्भात तक्रार नोंदवली.
Mumbai: दिल्ली-मुंबई फ्लाइट (Delhi-Mumbai Flight) मध्ये एका महिला डॉक्टरचा लैंगिक छळ (Sexually Assaulted) झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 47 वर्षीय प्राध्यापकाला अटक केली आहे. बुधवारी ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दिल्लीहून पहाटे 5.30 वाजता उड्डाण केलेल्या फ्लाइटमध्ये 24 वर्षीय महिला आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी बसले होते.
पीडिता ही एक डॉक्टर असून तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, विमान मुंबई विमानतळावर उतरण्याच्या काही वेळापूर्वी आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला. पीडितेने फ्लाइटच्या क्रू मेंबर्सना यासंदर्भात माहिती दिली. विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर ते सहार पोलिस ठाण्यात गेले आणि महिलेने यासंदर्भात तक्रार नोंदवली. (हेही वाचा -Pregnant Woman Death: इगतपुरी येथील गर्भवती महिलेचा मृत्यू रस्त्याअभावी नव्हे, वैद्यकीय अहवालात पुढे आले धक्कादायक कारण, घ्या जाणून)
पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे प्राध्यापकाविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.
तथापी, फ्लाइटमध्ये महिलेचा लैगिंक अत्याचार होण्याची ही पहिलीचं वेळ नाही. यापूर्वी देखील अशा स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विमान कंपनीने याबाबत अधिक दखल घेण आवश्यक आहे. तसेच विमानात महिलांच्या सुरक्षेसाठी योग्य ते पाऊल उचलणं आवश्यक आहे.