मुंबई मध्ये 28 वर्षीय महिला कॉन्स्टेबलचा शस्त्रक्रियेपूर्वी Anaesthesia दिल्यानंतर मृत्यू; पोलिसांकडून मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू
गौरी पाटील चं पोस्टिंग हे मरोळ च्या स्थानिक आर्म डिव्हिजन मध्ये होते. 2017 पासून गौरी पोलिस दलामध्ये काम करत होती.
मुंबई मध्ये 28 वर्षीय महिला पोलिस कॉन्स्टेबलचा (Police Constables) कानाच्या शस्त्रक्रियेदरम्यान Anaesthesia दिल्यानंतर गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. ही घटना एका खाजगी हॉस्पिटल मधील आहे. माहितीनुसार, मृत कॉन्स्टेबलचं नाव गौरी सुभाष पाटील आहे. गौरीला अंधेरीच्या (Andheri) लोखंडवाला (Lokhandwala) भागातील Axis Hospital मध्ये दाखल करण्यात आले होते.
कानातून काही पाण्यासारखा घटक बाहेर येत असल्याच्या तक्रारीवरून गौरीच्या कानाकर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्येपोलिसांना या मृत्यूची माहिती रात्री 10.30-10.45 च्या सुमारास देण्यात आली. Indian Express ला मृत गौरीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, 'शस्त्रक्रिया शुक्रवारी ठरली होती मात्र अचानक डॉक्टरांनी ती गुरूवारी करण्याचा निर्णय घेतला आणि शस्त्रक्रियेनंतर तिला देण्यात आलेल्या anaesthesia नंतर तिची प्रकृती ढासळत गेली.' नंतर तिला ICU मध्ये ठेवले पण काही तासांतच तिचा मृत्यू झाला. दरम्यान गौरीच्या कुटुंबियांनी तिला anaesthesia चा ओव्हरडोस झाल्याचं म्हटलं आहे.
मृत्यूचं कारण समजून घेण्यासाठी गौरीचा मृतदेह रात्री कूपर हॉस्पिटल मध्ये पोस्ट मार्टम साठी पाठवण्यात आला. आंबोली पोलिस स्टेशन मध्ये गौरीच्या मृत्यूचं कारण Accidental Death Case असं नोंदवण्यात आले आहे. गौरी चं पोस्टिंग हे मरोळ च्या स्थानिक आर्म डिव्हिजन मध्ये होते. 2017 पासून गौरी पोलिस दलामध्ये काम करत होती.
आंबोली पोलिस स्टेशन च्या पोलिसांकडून गौरीच्या मृत्यूचं कारण शोधलं जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. गौरीच्या पश्चात तिचे दोन भाऊ आणि आई वडील आहेत. कुटुंबाच्या माहितीनुसार, गौरीची प्रकृती शस्त्रक्रियेपूर्वी ठीक होती. आता पोस्ट मार्टमचा अहवालचं गौरीचा मृत्यू anaesthesia च्या ओव्हर डोस मुळे झाला का? हे सांगू शकतील.