Borewell Cable Catches Fire: बोअरवेलच्या केबलला आग लागल्याने महिलेचा मृत्यू, अंबड येथील घटना

एका महिलेचा बोअरवेलच्या केबलला आग लागल्याने होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे

Death PC PIXABAY

Jalna Fire News: जालन्यातील अंबड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचा बोअरवेलच्या केबलला आग लागल्याने होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. महिला स्वयंपाक घरात जेवण बनवत असताना ही घटना घडली. (हेही वाचा- महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा मते असं होरपळून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ती घरात स्वयंपाक बनवत होती. त्यावेळी पाणी संपल्याने स्वंयपाक घरात असलेला बोअरवेलला सुरु करण्यासाठी गेल्या. परंतु तेथे काळाने घाला घातला. पूजाला विद्यूत केबलचा झटका लागला. त्या तेथेच चिटकून राहिल्या. त्यानंतर केबलला आग देखील लागली. आग लागल्याने पूजा या जिवंत जळल्या. आग लागल्याची माहिती गावकऱ्यांना कळताच, मदतीसाठी धाव घेतला.

आग विझवण्याचे पूर्णपणे प्रयत्न केला. परंतु त्या आगी होरपळल्या आणि त्यांच्या मृत्यू झाला. आगीमुळे आसपासच्या परिसरात आगीमुळे धूरांचे लोट पसरले आहे. स्वंयपाक घरातील आगीमुळे सर्व वस्तू जळून खाक झाल्या. घरात ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने भडका घेतला. या घटनेनंतर अंबड पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. गावकऱ्यांनी या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली आहे.



संबंधित बातम्या