Woman Attacks Husband’s Lover: पतीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेवर पत्नीचा चाकूहल्ला; कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील घटना
ही धक्कादायक घटना कल्याण (Kalyan) रेल्वे स्थानकाबाहेरील आहे.
Woman Attacks Husband’s Lover With A Chopper: पतीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेवर पत्नीने चाकू हल्ल्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना कल्याण (Kalyan) रेल्वे स्थानकाबाहेरील आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या घटनेनंतर तेथील नागरिकांनी जखमी महिलेला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेऊन दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असता, तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेने आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रिया जाधव असे आरोपी महिलेचे नाव आहे. प्रिया पती शिवदाससह कल्याणजवळील आंबिवली येथे राहायला आहेत. शिवदास हे कंत्राटदार असून त्याचे अन्य एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत, असा संशय प्रिया यांना होता. त्यानुसार प्रिया यांनी गुरुवारी पती शिवदास यांचा कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत पाठलाग केला. त्यावेळी शिवदास हा कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर एका महिलेशी बोलत असताना प्रियाने पाहिले. त्यावेळी प्रिया आणि पीडित महिला यांच्यात बाचाबाची झाली. या वादातून प्रिया हिने तिच्याजवळ असलेला चाकू बाहेरकाढून त्या महिलेवर सपासप वार केले. यात ती महिला जखमी झाली असून नागरिकांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- पालघर: गुरे चारण्यासाठी गेलेल्या आदिवासी मुलीवर बलात्कार; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून हल्ला करण्यासाठी आणलेला चाकू हस्तगत करण्यात आला आहे. आपल्या पतीचे महिलेसोबत अफेअर होते. तसेच तो या महिलेवर सर्व पैसे खर्च करायचा. या रागातून आरोपी महिलेने पीडितेवर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.