Married Boyfriend Killed Woman in Virar: प्रियकराकडून विवाहित महिलेची गळा आवळून हत्या; विरार येथील घटना

धनश्री अंबाडस्कर (Dhanashree Ambadaskar) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. प्रियकर शेखर कदम याने गळा दाबून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Killed by Strangled | (Photo credit: archived, edited, representative image)

पालघर जिल्ह्यातील विरार (पूर्व) येथे सोमवारी एका 32 वर्षीय विवाहित महिलेची गळा आवळून हत्या (Secret Lover Strangulates Woman) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धनश्री अंबाडस्कर (Dhanashree Ambadaskar) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. प्रियकर शेखर कदम याने गळा दाबून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. विरार पोलिसांनी (Virar Police) त्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. पीडित महिला आपल्या ऑटो-रिक्षा चालक पती आणि दोन मुलींसोबत राहात होती. तिचा पती कामावर आणि त्यांच्या दोन मुली शाळेत असताना आरोपी त्यांच्या घरी गेला.

डॉक्टरांना संशय, पोलिसांची मदत

विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम सायंकाळी 5.45 च्या सुमारास धनश्रीच्या साईनाथ अपार्टमेंट, फुलपाडा येथील राहत्या घरातून बाहेर पडला तेव्हा, तिने किंचाळत शेजाऱ्यांना सावध केले. त्यानंतर पुढच्या काहीच वेळात ती कोसळली आणि बेशुद्ध पडली. शेजाऱ्यांनी कदम यांना तातडीने रुग्णालयात नेण्यास मदत केली. तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांना गळा दाबल्याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे कदम यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. (हेही वाचा, Virar Shocker: आई ओरडली म्हणून 16 वर्षीय मुलाची आत्महत्या, विरारमधली घटना)

प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचा आरोप

तपासादरम्यान, धनश्रीचा पती रुपेश अंबाडकर याने पोलिसांना सांगितले की, कदम यांच्यासोबत पत्नीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती आणि त्याच्यावरच हत्येचा संशय आहे. आरोपी रुपेशने खुलासा केला की, त्याने पत्नीला संबंध संपवण्याची धमकी दिली होती आणि धनश्रीने ही बाब कदम यांना सांगितली होती. त्यानंतर आरोपीने 19 मे रोजी तिला पुन्हा एकदा धमकी दिली होती. रुपेशने कदम यांच्याविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. (हेही वाचा, Virar Suicide News: आधी नस कापली मग गळफास घेतली राहत्या घरी तरुणाची आत्महत्या, विरारमधील खळबळजनक घटना)

सोसायटीतील रहिवाशांकडून पतीला तातडीने माहिती

धनश्रीचा पती रुपेश याने हे देखील सांगितले की, सोमवारी दुपारी 12:15 च्या सुमारास धनश्रीने त्याला तातडीने फोन केला परंतु त्याने त्याचे कारण सांगितले नाही. एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून नोकरीला असलेला रुपेश त्यावेळी काम सोडू शकत नव्हता. त्यानंतर संध्याकाळी 5.45 च्या सुमारास रुपेशला शेजाऱ्याचा फोन आला की धनश्री बेशुद्ध आहे आणि तिला त्वरित वैद्यकीय मदतीची गरज आहे. यावेळी कदम त्यांच्या घरी असल्याचे रूपेशला माहीत नव्हते. पोलीस सध्या हत्येमागील कारणाचा तपास करत आहेत. कदम हे विवाहित असून त्यांना एक मुलगी आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटना घडली त्या इमारतीतील रहिवासी अद्यापही या धक्क्यातून सावरले नाहीत. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.