Varsha Gaikwad: महाराष्ट्रातील शाळा दिवाळीनंतर सुरु होणार? पाहा काय म्हणाल्या, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
मात्र, राज्यात टप्प्याटप्प्याने बऱ्याच गोष्टी सुरु करण्यात आल्या आहे. परंतु, राज्यातील शाळा गेल्या सात महिन्यांपासून बंद असून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये आहे. मात्र, राज्यात टप्प्याटप्प्याने बऱ्याच गोष्टी सुरु करण्यात आल्या आहे. परंतु, राज्यातील शाळा गेल्या सात महिन्यांपासून बंद असून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. मात्र, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्वाचे आहे. यामुळे राज्यात दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. तसेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय होईल, असेही त्या म्हणाल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाउन सुरु केल्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. याचपार्श्वभूमीवर शालेय शिक्षणाचे वर्ष 15 जूनला ऑनलाइन पद्धतीने सुरु झाले. मात्र, शाळा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, नववी ते बारावीच्या विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग आहे. तसेच त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याबाबत आधी विचार होईल, असे वर्षा गावकवाड एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- Building Collapses in Dombivli: रात्रभर वेब सीरीज पाहण्याच्या एका तरूणाच्या सवयीमुळे वाचले तब्बल 75 जणांचे प्राण
महाराष्ट्रात अजून कोरोनाचे संकट कायम आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16 लाख 60 हजार 766 वर पोहचली आहे. राज्यात एकूण 14 लाख 94 हजार 809 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 89.69% एवढा झाला आहे. सध्या राज्यात 25 लाख 33 हजार 687 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 12 हजार 690 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.