सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणा आडून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी करणार्यांनी माफी मागावी: महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (6 ऑक्टोबर) सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणा आडून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी करणार्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (6 ऑक्टोबर) सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh RajputCase) प्रकरणा आडून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी करणार्यांनी माफी मागावी अशी मागणी करत बिहार निवडणूकीमध्ये (Bihar Elections) भाजपा प्रभारी म्हणून काम करणार्या माजी महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील सवाल विचारला आहे. आता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) बिहारचे माजी डीसीपी गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar Pandey), ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली त्यांचा प्रचार करणार का? असं सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? असा सवाल विचारण्यात आला होता. तसेच मुंबई पोलिस सत्य दडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप लावत सारा तपास सीबीआयकडे सोपावण्यात आला आहे. परंतू काही दिवसांपूर्वीच दिल्लीच्या एम्स रूग्णालयाने सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे सीबीआयनेदेखील आता त्यांचा अहवाल लवकर सादर करावा असं सांगितलं आहे. Sushant Singh Rajput प्रकरणी SM रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केले स्वागत, लवकरच या प्रकरणाचा खुलासा करणार.
सुशांत सिंग राजपूत मृत्यूला बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठं करण्यात आलं होतं. आता भाजपाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहारचे प्रभारी केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करणारे बिहारचे माजी डिसीपी गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला फडणवीस उतरणार का? असा सवाल अनिल देशमुखांनी आज उपस्थित केला आहे. सुशांतसिंग राजपूत मृत्यूनंतर मुंबई पोलिसांबद्दल, महाराष्ट्राबद्दल अनेक बदनामीकारक शब्दांचा, भाषेचा वापर करण्यात आला होता. आता एम्सच्या रिपोर्टनंतर महाराष्ट्राला बदनाम करणार्यांनी माफी मागावी अन्यथा जनता त्यांना भविष्यात माफ करणार नाही असे देखील देशमुख म्हणाले आहेत.
सुशांतसिंग राजपूतने 14 जून दिवशी वांद्रे येथील राहत्या घरी गळफ़ास घेत आत्महत्या केली आहे.