Deers Spotted In Pune: गवा दिसला, आता पुणे येथे हरणांचा कळप करतोय मुक्तसंचार; शिवणे परिसरात मानवी सोसायटीत वावर

या परिसरात विविध वन्य प्राणी आढळतात. याच परिसराला लागून शिवणे येथील आशीर्वाद सोसायटी आहे. सोसायटीच्या लगत असलेली एनडीए कुंपणाची भिंत काही कारणामुळे कोसळली आहे. ती तशीच पडून आहे. त्यामुळे या कुंपणाच्या पडलेल्या भिंतीतून हरणांनी सोसायटी आवारात प्रवेश केला.

Deers | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) शहर आणि परिसरात वन्य प्राण्यांचे (Wildlife) दर्शन होण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरात मानवी वस्तीत एक गवा (Gaur) आढळून आला होता. आता चक्क हरणांचा कळप पाहालया (Deers Spotted In Pune) मिळाला आहे. होय, पुणे शहरापासून काही अंतरावर असलेला शिवणे (Shivne) परिसरातील आशीर्वाद सोसायटी (Ashirwad Society) आवारात हा कळप दिसला. येरवी हरीण (Deers) पाहण्यासाठी जंगलात जावे लागते. परंतू, पुणेकरांना थेट आपल्या सोसायटीतच हरीणांचा कळप पाहायला मिळाला.

पुणे शहरात असलेल्या एनडीए लगत जंगल परिसर आहे. या परिसरात विविध वन्य प्राणी आढळतात. याच परिसराला लागून शिवणे येथील आशीर्वाद सोसायटी आहे. सोसायटीच्या लगत असलेली एनडीए कुंपणाची भिंत काही कारणामुळे कोसळली आहे. ती तशीच पडून आहे. त्यामुळे या कुंपणाच्या पडलेल्या भिंतीतून हरणांनी सोसायटी आवारात प्रवेश केला.

हरणांना पाहून सोसायटी आणि परिसरातील बाळगोपाळ आनंदून गेले. मोठ्यांनीही या पाहुण्यांचे स्वागत केले. परंतू, सोसायटी आणि परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावरही मोठा आहे. त्यामुळे सोसायटीत आलेल्या हरणांच्या कळपाला असलेला संभाव्य धोका विचारात घेऊन वन विभागाला याची कल्पना देण्यात आली. (हेही वाचा,'Please Forgive Us- We are Guilty': 'आम्हाला माफ कर' गव्याची प्रतिकृती साकारुन पुणेकरांचा माफीनामा )

प्राप्त माहितीनुसार वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या आधी गव्यासोबत घडलेला प्रकार ताजा असल्याने हरणांसोबत असा अनुचित प्रकार टाळण्यासाठी वन विभाग कार्यरत झाला. पुणे शहरात या आधी एका पाठोपाठ एक असे दोन वेळा गव्याचे दर्शन झाले आहे. पहिल्यांदा गवा दिसला तेव्हा नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे गवा बिथरला. परिणामी तो नागरी वस्तीत सैरावैरा धावू लागला. यात गवा मोठ्या प्रमाणावर जखमी झाला. वन विभागाने त्याला पकडेपर्यंत त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्त गेले होते. रक्तदाब वाढल्याने अखेर गव्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या वेळी गवा दिसल्यानंतर मात्र प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन त्याची सुटका केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif