'पत्नीचा पगार माझ्यापेक्षा जास्त! देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतेच अर्थसंकल्प सोप्या भाषेत पुस्तकाचे प्रकाशन मुंबईमध्ये करण्यात झाले. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी फडणवीस आपल्या भाषणामध्ये कमाई आणि खर्चासंदर्भात बोलत होते. त्यावेळी माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे, असे वक्तव्य केले होते.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतेच अर्थसंकल्प सोप्या भाषेत पुस्तकाचे प्रकाशन मुंबईमध्ये करण्यात झाले. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी फडणवीस आपल्या भाषणामध्ये कमाई आणि खर्चासंदर्भात बोलत होते. त्यावेळी माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार आहे, असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरून आता देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात अमृता यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता यांनी देवेंद्र फडणवीस खरे बोलल्याचे सांगितले. पत्नीचा पगार आपल्यापेक्षा जास्त असल्याचे त्यांना वाईट वाटत नाही. पुरुषांमध्ये जो इगो असतो तो देवेंद्रजींमध्ये नाही, याचा मला आनंद आहे, असेही अमृता फडणवीस त्यावेळी म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईमध्ये करण्यात झाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्रजींनी जे वक्तव्य केलं आहे ते खरे आहे. देवेंद्रजी नेहमी खरे बोलतात. हो माझी आता तरी त्यांच्यापेक्षा टेकहोम सॅलरी जास्त आहे. माझा पगार जास्त असल्याचा त्यांना अभिमान वाटतो याचा मला गर्व आहे. पत्नीचा पगार आपल्यापेक्षा जास्त असल्याचे त्यांना वाईट वाटत नाही. पुरुषांमध्ये जो इगो असतो तो देवेंद्रजींमध्ये नाहीय याचा मला आनंद आहे, असे अमृता फडणवीस या म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- राम मंदिराच्या ट्रस्टवर शिवसेनेच्या एका प्रतिनिधीला ट्रस्टी म्हणून स्थान द्यावे' आमदार प्रताप सरनाईक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
पुस्तक योग्य वेळी उपलब्ध होतयं याचा आनंद आहे. या पुस्तकाचा उपयोग सर्वांना होणार आहे. सामान्य माणसासाठी सोप्या भाषेत अर्थसंकल्प कळावा म्हणून हे पुस्तक लिहिले आहे. सामान्य माणसातल्या अर्थमंत्र्याला हे पुस्तक खूप उपयोगी पडणार आहे. हे पुस्तक सोप्या भाषेत असल्याने फडणवीस यांचे अभिनंदनही सोप्या भाषेत करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे शरद पवार अर्थ संकल्प सोप्यात भाषेत या पुस्तकाच्या प्रकाशन दरम्यान म्हणाले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)