Thane Crime News: ठाण्यात कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून केला खून, आरोपी पतीला अटक

महाराष्ट्रातील ठाणे जिल्हायात एका कौटुंबिक वादातून एका ३७ वर्षीय व्यक्तीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.

Crime (PC- File Image)

Thane Crime News: महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे (Thane) जिल्हायात एका कौटुंबिक वादातून एका ३७ वर्षीय व्यक्तीने पत्नीचा गळा दाबून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मंगळवारी या घटनेची माहिती ठाणे पोलिसांना देण्यात आली. अलिमुना अन्सारी असं मृत महिलेचे नाव आहे. मयुद्दीन असं आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी टिटवाळा परिसरात रिक्षा चालवतो. पत्नी सोबत आरोपी कल्याण परिसरातील टिटवाळा शहरात राहतो. या घटनेची माहिती परिसरात पसरताच, मोठी शांतता झाली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार भांडण सुरु होते. नेहमी प्रमाणे आज सकाळीही आरोपी आणि त्याच्या पत्नीचे भांडण झाले आणि त्यानंतर रागाच्या भरात मयुद्दीनेने आपल्या पत्नीला काठीने मारहाण केली त्यानंतर महिलेचा गळा दाबला. गळा इतका जोरात आवळला की, महिलेला श्वास घेण्यास त्रास झाला दरम्यान तीनं अखरेचा श्वास सोडला. हेही वाचा- मीरा रोड खून प्रकरणातील आरोपी मनोज सानेला 6 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

ही माहिती पोलीसांना मिळताच, टिटवाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला.पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे," असे अधिकाऱ्यांनी सुत्रांना माहिती दिली. या घटनेनंतर टिटवाळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement