Satish Wagh Murder Case: प्रेम प्रकरणातून बायकोनेचं दिली सुपारी अन् केला खून; सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंतचा मोठा खुलासा
Satish Wagh Murder Case : भाजप आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ (Mohini Wagh) यांनीच त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. याबाबतची कबुली सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनी पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात मोठा खुलासा केलाय. (Satish Wagh Murder Case: आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ मृत्यू प्रकरणी एकाला अटक)
सतीश वाघ यांचा खून
आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण होते. या प्रेम प्रकरणात सतीश वाघ आडवे येत असल्याने त्यांना पाच लाखाची सुपारी देऊन संपवण्यात आले. अशी कबुली मोहिनी वाघ यांनी पोलिसांकडे दिली आहे.
सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे खाली दिली आहेत.
1. मोहिनी वाघ
2. पवनकुमार शर्मा
3. विकास शिंदे
4 . अतिश जाधव - धाराशिव
5. अक्षय जवळकर - सुपारी देण्यात आलेला व्यक्ती.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
भाजप आमदार योगेश टीळेकर याचे मामा सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला पहाटे अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना चारचाकी गाडीतून अज्ञान स्थळी नेण्यात आलं. सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली होती.
वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला होता.