Akola Shocker: बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या, अकोलातील धक्कदायक घटना

अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार उलगडला आहे. एका पत्नीने आपल्या मुलाच्या वयाच्या प्रियकराची मदत घेवून पतीचा खून केला आहे

Akola Shocker: बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या, अकोलातील धक्कदायक घटना
हल्ला | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Akola Shocker: अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार उलगडला आहे. एका पत्नीने आपल्या मुलाच्या वयाच्या प्रियकराची मदत घेवून पतीचा खून केला आहे.या घटनेमुळे शहारतो मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दोघां आरोपीला अटक केली आहे. पत्नीने रागाच्या भरात हत्या केली आहे. शेतात मृतदेह सापडल्याने ही घटना उघडकीस आली आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर वेगाने तपास सुरु केला. मृताच्या अंगावर शस्त्राने वार केलेल्या खूना आढळल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील अकोलफेल पोलिस स्टेशन हद्दीतील उगवा गावातील ही घटना घडली. पाच दिवसांपुर्वी कुरणात मृतदेह सापडला होता. मृतदेहाची तपासणी केल्यावर त्याच्या शरिरावर खूना दिसल्या. दरम्यान पोलिसांनी  हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यावेळी या व्यक्तीची ओळख समोर आली. विद्यावान प्रधान असं मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विद्यावानच्या पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने हत्या करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी शोधून काढली.

कंकूला विद्यावान प्रधान (वय ४०), लकी श्रवण तेलंतेअसे आरोपींची नावे आहेत. आरोपी अकोल्यातील मोठी उमरी गावातील रहिवासी आहे. पोलिसांनी दोघांना सापळा रचून ताब्यात घेतला. विद्यावान आणि कंकु यांच्या मोठा मुलाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विद्यावान दारूचे व्यसन करत असयाचा. त्यामुळे मुलाने आयुष्य संपवले असं विद्यावानच्या पत्नीने खुलासा केला. विद्यावान काही कामधंदा करायाचा नाही त्यामुळे पत्नीला त्याचा राग यायचा.

पत्नी कंकू ही हॉटेलमध्ये काम करायची, तिथे तीने लकीशी ओळख केली. सुरवातीला दोघे मित्र झाले. ननंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले. २० वर्षाहून लकी लहान आहे. कंकूनी लकीला सर्व हकीकत सांगितली. विद्यावान आणि कुंकू हे दोघेही वेगवेगळे राहत होते. लकीआणि कंकूनी विद्यावानला मारून टाकयचे ठरवले. लकीने विद्यावानाला दारू पाजवून शेतात घेवून त्याच्यावर शस्त्राने हल्ला केला.या हल्लेत त्याने प्राण सोडला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.

मृतांच्या नातेवाईकांनी कुंकूवर आरोप केला. त्यानंतर पोलीसांनी या घटनेचे संपुर्ण तपासणी केली  आणि दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात खूनाची कबुली देण्यात आली.

(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2023 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).