Pune Vidyanand Bapat: पुण्यातील गणेशोत्सवात डीजे बंदीच्या मागणीमुळे चर्चेत आलेले विद्यानंद बापट कोण आहेत?

पुण्यातील नारायण पेठ भागातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सव २०२६ दरम्यान डीजे आणि उच्च आवाजाच्या ध्वनियंत्रणेवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करत महापालिकेच्या बैठकीत खळबळ उडवून दिली. या मागणीमुळे त्यांच्यावर टीका-प्रतिटीकेची राळ उठली आहे.

Vidyanand Bapat

पुण्यातील नारायण पेठ परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) केवळ पुण्यातच नव्हे तर आता सोशल मीडीयातही मोठ्या चर्चेचा विषय बनले आहेत. गणेशोत्सव 2026 दरम्यान डीजे आणि आवाजाच्या ध्वनियंत्रणेवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या (PMC) एका बैठकीत केली आणि यावरून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा तीव्र वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बापट यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

विद्यानंद बापट कोण आहेत?

विद्यानंद बापट 37 वर्षीय समाजिक कार्यकर्ते आहेत. ते अविवाहित असून त्यांचे मूळ गाव रत्नागिरी आहे मात्र मागील 8 वर्षांपासून ते पुण्यात कामानिमित्त नारायण पेठेत राहतात. ते बीपीओ क्षेत्रात काम करत असून मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत.

विद्यानंद बापट यांची डीजे बंदीची मागणी का ?

विद्यानंद बापट यांनी पुण्यात डीजे आणि उच्च आवाजाच्या ध्वनिवर्धक यंत्रणांवर वर्षभर किंवा किमान गणेशोत्सवाच्या काळात तरी पूर्ण बंदी घालावी, अशी मागणी केली. यासाठी त्यांनी सोलापूर शहराचे उदाहरण दिले, जिथे अशा प्रकारचे निर्बंध लागू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुण्यात अनेक आयटी क्षेत्रातील कर्मचारी आहेत. नाईट शिफ्ट मध्ये काम करणार्‍या अनेकांना दिवसा-रात्री मोठ्या आवाजाच्या संगीतामुळे त्यांना त्रास होतो, असा मुद्दाही बापट यांनी मांडला. 2000 मध्ये तयार करण्यात आलेल्या ध्वनी प्रदूषण नियमांचा सध्याच्या काळानुसार पुनर्विचार व्हावा, अशी त्यांची भूमिका आहे. नक्की वाचा: Vidyanand Bapat Assault: पुण्यात गणेशोत्सवात डीजे विरोधी भूमिका घेणार्‍या विद्यानंद बापट यांना मारहाण. 

'मराठीतील शशी थरूर' म्हणून गंमतीने ओळख

विद्यानंद बापट अनेक वृत्त वाहिन्या, पोर्ट्ल्सवर आपल्या भूमिकेचे समर्थन करताना त्यांच्या ओघवत्या आणि अस्खलित मराठी भाषेच्या वापरामुळे ते सोशल मीडीयातही चर्चेत आले. अनेकांनी त्यांचं मराठी ऐकून, त्यांची शब्दसंपदा पाहून त्यांना 'मराठीतील शशी थरूर' असे बिरूदही दिले आहे.

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्... सुभाषिताची चर्चा

विद्यानंद बापटांनी आपली भूमिका मांडताना घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्... या सुभाषिताचा वापर केला होता. त्यानंतर अनेकांना याचा अर्थ काय? याबद्दल कुतुहूल आहे. यावर अनेकांनी रिल्सही बनवण्यात आल्या आहेत. दरम्यान या सुभाषिताचा अर्थ “मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे. असा आहे. हे देखील बापटांनी सांगितले आहे.

विद्यानंद बापट यांचा आवडता नेता कोण?

विद्यानंद बापट यांनी एका मुलाखती मध्ये बोलताना अमेरिकन सिनेटर बर्नी सँडर्स हे त्यांचे आवडते नेते असल्याचं म्हटलं आहे. बर्लिंग्टनचे मेअर ते सिनेटर असा प्रवास केलेले बर्नी सँडर्स न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांचेही मार्गदर्शक आहेत. मात्र भारतातील आवडता नेता ठरवणं कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement