Vidyanand Bapat Assault: पुण्यात गणेशोत्सवात डीजे विरोधी भूमिका घेणार्‍या विद्यानंद बापट यांना मारहाण

विद्यानंद बापट यांनी मारहाणी नंतर प्रतिक्रिया देताना घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्... सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला झाल्याचं म्हटलं आहे.

Vidyanand Bapat Assault: पुण्यात गणेशोत्सवात डीजे विरोधी भूमिका घेणार्‍या विद्यानंद बापट यांना मारहाण
विद्यानंद बापट मारहाण

पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांना आज मारहाण झाली आहे. पुण्यात एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना एका इसमाने समोरून येत त्यांच्या गालावर चापटी मारली. अचानक झालेल्या या प्रकाराने सारेच काही वेळ गोंधळले. उपस्थितांनी तातडीने मध्यस्थी करत त्यांना एकमेकांपासून लांब केले. मात्र नंतरही मारहाण करणार्‍या व्यक्तीने स्वतःच्या कृतीचे समर्थन करत विद्यानंड बापट यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच पोलिस तेथे दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाई केली आहे.

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...चिप प्रसिद्धीसाठी हल्ला

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakal News (@sakalmedia)

विद्यानंद बापट यांनी मारहाणी नंतर प्रतिक्रिया देताना घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्... सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला झाल्याचं म्हटलं आहे. घडल्या प्रकराचे, सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

विद्यानंद बापट यांना का झाली मारहाण?

View this post on Instagram

A post shared by Sakal News (@sakalmedia)

 घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्... ची सोशल मीडीयाला भूरळ

विद्यानंद बापटांनी आपली भूमिका मांडताना घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्... या सुभाषिताचा वापर केला होता. त्यानंतर अनेकांना याचा अर्थ काय? याबद्दल कुतुहूल आहे.  यावर अनेकांनी रिल्सही बनवण्यात आल्या आहेत. दरम्यान या सुभाषिताचा अर्थ  “मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे. असा आहे. नेटकर्‍यांकडून विद्यानंद बापट यांच्या भूमिकेबद्दल संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरीही अनेकांनी बापटांच्या अस्खलित मराठी भाषेचं कौतुक केले आहे.

विद्यानंद बापट यांची भूमिका काय?

पुणे महापालिकेच्या गणेशोत्सवपूर्व बैठकीत विद्यानंद बापट यांनी सहभाग घेत डीजेच्या आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला विरोध केला होता. विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, उत्सव साजरा करताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुका, लाऊडस्पीकर आणि डीजेमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा नागरिकांवर होणारा परिणाम विद्यानंद बापट यांनी बैठकीत मांडल्यापासून ते चर्चेमध्ये आले आहेत. मुख्य रस्ते बंद करून मोठ्या मिरवणुका काढल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो, त्यामुळे उत्सवाच्या पद्धतीत कालसुसंगत बदल करण्याची गरज असल्याचेही विद्यानंद बापट यांनी सांगितले.

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2026 03:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).